नागपूर : पावणेतीन लाख रुपयांचा कुरिअर बॉक्स विमानतळावरून चोरीला गेला. राजेंद्र सूर्यंवशी (४८) यांनी यासंबंधात तक्रार दाखल केली आहे. शाहू ले आऊट खडगाव रोड वाडी येथे त्यांचे मोबाईलचे दुकान आहे. ओम लॉजेस्टिक कंपनी इंदोर येथून त्यांनी २ लाख ७२ हजार १३१ रुपये किमतीचा १५ मोबाईल असलेला एक बॉक्स कुरिअरने बोलाविला. २६ मार्च ते २७ मार्चदरम्यान त्यांचा मोबाईल असलेला बॉक्स जेट एअरवेज कुरिअरच्या माध्यमातून नागपूर विमानतळावर पाठविण्यात आला. तो अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. कुणीतरी तो चारून नेला. यासंबंधात सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
पावणेतीन लाखाचे कुरिअर विमानतळावरून लंपास
By admin | Updated: June 18, 2015 02:27 IST