शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतचा दणका : नागपूरच्या सेंट्रल बाजार रोडने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 23:18 IST

रामदासपेठ येथील सेंट्रल बाजार रोडवरील अतिक्रमणाबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. शुक्रवारी या रस्त्यावरील अतिक्रमणाविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात आली. त्यामुळे या रस्त्याने व येथील फूटपाथनेही मोकळा श्वास घेतला.

ठळक मुद्देप्रशासनाला आली जाग, अतिक्रमण हटविले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामदासपेठ येथील सेंट्रल बाजार रोडवरील अतिक्रमणाबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. शुक्रवारी या रस्त्यावरील अतिक्रमणाविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात आली. त्यामुळे या रस्त्याने व येथील फूटपाथनेही मोकळा श्वास घेतला. 

रामदासपेठ येथील सेंट्रल बाजार रोडवर इस्पितळ, खासगी आस्थापने, शाळा, रेस्टॉरंट आदी मोठ्या प्रमाणावर आहेत. या रस्त्यावरून चालणे म्हणजे एक परीक्षाच असते. फूटपाथ शोधूनही सापडणार नाही, अशी अवस्था असते. पार्किगमुळे नेहमीच ट्रॅफिक जॅम असते. रेस्टॉरंट चालकांनी तर फूटपाथवरच दुकान थाटले आहे. एकूणच या सर्वांचा त्रास सामान्य नागरिकांना सोसावा लागतो. लोकमतने यावर शुक्रवारच्या अंकात ’सेंट्रल बाजार’ मार्ग झाला कोंडीचे केंद्र’ या शिर्षकांतर्गत वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले होते. वृत्त प्रकाशित होताच खळबळ उडाली. प्रशासनाने तातडीने अतिक्रमण विरोधी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. अतिक्रमण विरोधी पथक जेसीबीसह सेंट्रल बाजार रोडवर पोहोचले. जेसीबीच्या मदतीने या रस्त्यावरील विविध प्रतिष्ठानांचे अतिक्रमण, बोर्ड हटविण्यात आले. विशेष म्हणजे अनेक प्रतिष्ठान, दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिकांनी रस्त्याच्या काठावर अतिक्रमण करून शेड उभारले होते. ते पाडण्यात आले. काही ठिकाणी शक्य होते ते काढण्यात आले.पक्के बांधकामही तोडले
काचीपुरा चौक ते लोकमत चौकापर्यंत अनेक रुग्णालये आहे. येथे अ‍ॅम्ब्युलन्ससह इतर वाहनांनी रुग्ण नियमित येत असतात. यातच दुकानदरांनी केलेल्या अतिक्रमणामुळे त्यांनाही त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाने सकाळपासून सुरू केलेल्या कारवाईदरम्यान काही पक्के अतिक्रमण बांधकामही पाडण्यात आले. या कारवाईमुळे अतिक्रमण करणारे हादरले आहेत.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणnagpurनागपूर