शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

लोकमतच्या शर्मा यांची चमकदार कामगिरी

By admin | Updated: June 15, 2015 03:09 IST

डॉ. दिवाकर भोयर (बहुजन संघर्ष), राजेश शर्मा (लोकमत), आश्लेषा जोशी (द टाइम्स आॅफ इंडिया) आणि रंजना गोंडाणे यांंनी

नागपूर : डॉ. दिवाकर भोयर (बहुजन संघर्ष), राजेश शर्मा (लोकमत), आश्लेषा जोशी (द टाइम्स आॅफ इंडिया) आणि रंजना गोंडाणे यांंनी रविवारी आयोजित तिरुपती अर्बन को-आॅपरेटिव्ह बँक मीडिया वॉकथॉन स्पर्धेत आपापल्या गटात जेतेपदाचा मान मिळविला. पावसाच्या व्यत्ययानंतरही स्पर्धकांचा उत्साह मात्र कायम होता. स्पोर्ट््स जर्नलिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरतर्फे (एसजेएएन) डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावरून मीडिया कर्मचाऱ्यांसाठी आयोजित या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रभाकर हार्ट इन्स्टिट्यूट स्पर्धेचे सहप्रायोजक होते. या स्पर्धेत ५० वर्षांवरील गटात डॉ. दिवाकर भोयर यांनी २२ मिनिट ७ सेकंद वेळेसह अव्वल स्थान पटकावले. महाराष्ट्र पत्रकार संघटनेचे श्रीधर बुरडे (२६.३१ मिनिट) यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. गतविजेते टाइम्स आॅफ इंडियाचे अलोक तिवारी व लोकमतचे अरविंद उपरे अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानाचे मानकरी ठरले. ५० वर्षांखालील गटात (४ किलोमीटर अंतर) लोकमतचे राजेश शर्मा (२२.०६ मिनिट) अव्वल स्थानाचे मानकरी ठरले. सकाळचे गोविंद हटवार (२२.१३ मिनिट) उपविजेते ठरले. लोकमतचे निखिल पागे (२६.०१ मिनिट) तिसऱ्या, गतचॅम्पियन शशिकांत रहाटे चौथ्या तर लोकमतचे रविराज अंबाडकर पाचव्या स्थानी राहिले. महिलांच्या २ किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत टाइम्स आॅफ इंडियाच्या आश्लेषा जोशी (१५.०५ मिनिट) यांनी बाजी मारली. दैनिक भास्करच्या अनिता श्रीवास्तव व सोनू वजेकरी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानाच्या मानकरी ठरल्या. लोकमतची अलका टोटे व टाइम्स आॅफ इंडियाची चारुलता यांना अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.कुटुंब गटासाठी असलेल्या स्पर्धेत रंजाना गोंडाणेने (१६.३५ मिनिट) अव्वल स्थान पटकावले. सरिता हुरमाडे (१६.३७ मिनिट) व सुनीता शर्मा (१७.४७ मिनिट) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानाच्या मानकरी ठरला. मनीषा शेळके यांना चौथ्या तर रंजना धाबेकर यांना पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याआधी, प्रभाकर हार्ट इन्स्टिट्यूटच्या डॉ. सतीष पोशेट्टीवार व डॉ. आंबेडकर कॉलेजचे उप-प्राचार्य डॉ. अरविंद जोशी यांनी वॉकथॉनला हिरवी झेंडी दाखवली. उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने, डॉ. पोशेट्टीवार, डॉ. अरविंद जोशी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते गिरीश गदगे यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. एसजेएएनचे अध्यक्ष डॉ. राम ठाकूर यांनी संचालन केले तर सचिव किशोर बागडे यांनी आभार मानले. निकाल(५० वर्षांवरील - ४ किलोमीटर) :- १) डॉ. दिवाकर भोयर (२२.०७ मिनिट). २) श्रीधर बुराडे (२६.३१ मिनिट). ३) अलोक तिवारी (२७.५४ मिनिट). ४) अरविंद उपरे (२८.१३ मिनिट). ५) राजेंद्र प्रसाद सिंग (२९.५३ मिनिट). ५० वर्षांपेक्षा कमी (४ किलोमीटर) १) राजेश शर्मा (२२.०६ मिनिट). २) गोविंद हटवार (२२.१३ मिनिट). ३) निखिल पागे (२६.०१ मिनिट). ४) शशिकांत रहाटे (२६.०९ मिनिट). ५) रविराज अंबाडकर (२६.१८ मिनिट). महिला (२ किलोमीटर) :- १) आश्लेषा जोशी (१५.०५ मिनिट). २) अनिता श्रीवास्तव (१६.२३ मिनिट). ३) सोनू वाजेकर (१७.२९ मिनिट). ४)अलका टोटे (१८.२२ मिनिट). ५) चारुलता मैत्र (१८.३० मिनिट). कुटुंब महिला (२ किलोमीटर) :- १) रंजना गोंडाणे (१६.३५ मिनिट). २) सरिता हुरमाडे (१६.३७ मिनिट). ३) सुनीता शर्मा (१७.४७ मिनिट). ४) मनीषा शेळके (१८.६९ मिनिट). ५) रंजना दाभेकर (१९.०१ मिनिट).(क्रीडा प्रतिनिधी)