शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

२०२१ व २०२२ चे लोकमत पां.वा. गाडगीळ आणि बाबा दळवी स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2023 08:00 IST

Nagpur News लोकमतचे प्रथम संपादक पद्मश्री पां. वा. गाडगीळ व लोकमतचे ज्येष्ठ संपादक म.य. उपाख्य बाबा दळवी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, लोकमततर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेचे २०२१ व २०२२ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

नागपूर  : लोकमतचे प्रथम संपादक पद्मश्री पां. वा. गाडगीळ व लोकमतचे ज्येष्ठ संपादक म.य. उपाख्य बाबा दळवी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, अनुक्रमे आर्थिक-विकासात्मक लेखन पत्रकारिता आणि शोधपत्रकारिता या दोन श्रेणींसाठी लोकमततर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेचे २०२१ व २०२२ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या स्पर्धेत संबंधित वर्षभरात मराठी भाषेतील वृत्तपत्रे, नियतकालिके व मासिकांमध्ये प्रसिद्ध झालेले लेख व बातम्यांना पुरस्कृत केले जाते. 

२०२१ व २०२२ चे पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे आहेत. (कंसात शीर्षक व वृत्तपत्राचे नाव). पां.वा. गाडगीळ आर्थिक-विकासात्मक लेखन स्पर्धा- वर्ष २०२१; प्रथम पुरस्कार-वंदना धर्माधिकारी, पुणे. (आत्मनिर्भर, साप्ताहिक अर्थशक्ती), द्वितीय पुरस्कार-विनोद धनाजी शेंडे, पुणे. (भूक निर्देशांक: घसरणीचा  विकास, लोकसत्ता). तृतीय पुरस्कार- प्रवीण घोडेस्वार, (महिला स्वच्छता कामगारांची दयनीय अवस्था, मिळून साऱ्याजणी)

वर्ष २०२२; प्रथम पुरस्कार- सूर्यकांत पाठक, पुणे. (ग्राहक हक्कांना मिळणार बळकटी, ग्राहकहित). द्वितीय पुरस्कार- डॉ. प्रतिमा इंगोले, अमरावती. (शेतीचा शोध घेऊनही स्त्रीची आर्थिक कोंडी, पुण्यनगरी). तृतीय पुरस्कार- समीर मराठे, नाशिक. (ट्रक ड्रायव्हर्सच्या आयुष्यावरील लेख, ‘उस्ताद’, लोकमत).  म.य. उपाख्य बाबा दळवी शोधपत्रकारिता स्पर्धा- वर्ष २०२१; प्रथम पुरस्कार-डॉ. योगेश प्रकाश पांडे, नागपूर (नागपुरात ‘नीट’चा घोटाळा, लोकमत). द्वितीय पुरस्कार- विश्वास पाटील, कोल्हापूर. (दामदुप्पट परताव्याचा भुलभुलैय्या, लोकमत). तृतीय पुरस्कार-विवेक भुसे, पुणे. (राज्यभर गाजलेल्या स्पर्धा परीक्षा गैरव्यवहार, लोकमत). 

वर्ष २०२२; प्रथम पुरस्कार-बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर. (शेकडो कोटींच्या अॉनलाईन घोटाळ्याचा भंडाफोड, लोकमत). द्वितीय पुरस्कार- इंदुमती सूर्यवंशी, कोल्हापूर. (जयप्रभा स्टुडिओची दोन वर्षांपूर्वीच विक्री, लोकमत). तृतीय पुरस्कार- सुमेध वाघमारे, नागपूर. (शासकीय वैद्यकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरचा अभाव, लोकमत) 

या पुरस्कार स्पर्धेकरिता आर्थिक-विकासात्मक लेखन गटासाठी दोन्ही वर्षांसाठी आलेल्या एकूण १०३ प्रवेशिकांमधून  ४७  प्रवेशिका स्पर्धेकरिता पात्र ठरल्या.  शोधपत्रकारिता गटासाठी आलेल्या ८६ प्रवेशिकांमधून ३६  प्रवेशिका पात्र ठरल्या. दोन्ही गटांच्या पात्र प्रवेशिकांमधून तीन-तीन विजेत्यांची निवड करण्यात आली. पुरस्कारांचे स्वरुप, रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. या स्पर्धांचे परीक्षण ज्येष्ठ संपादक कमलाकर धारप व दिलीप तिखिले यांनी केले आहे. या पुरस्कारांच्या वितरण सोहळ्याबाबतची सूचना कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर विजेत्यांना दूरध्वनीद्वारे दिली जाईल.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट