शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

११ फेब्रुवारीला नागपुरात रंगणार ‘लोकमत महामॅरेथॉन’चा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 10:38 AM

‘आॅरेंजसिटी’अशी ख्याती असलेल्या नागपूर शहरात येत्या ११ फेब्रुवारीला ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन होत आहे.

ठळक मुद्देमहामॅरेथॉनच्या नाव नोंदणीस सुरुवात धावपटूंत सहभागाविषयी प्रचंड उत्सुकता लोकमत समूहातर्फे आयोजित नागपूर व कोल्हापूर महामॅरेथॉनसाठी नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुकांना या दोन्ही महामॅरेथॉनची नोेंदणी नागपूर येथील लोकमत भवन,लोकमत चौक, वर्धा रोड येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करता येईल. या महामॅरेथॉनच्या नोंदणीत जास्तीत जास्त धावपटू, नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9922444288 अथवा 9922200063 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. या महामॅरेथॉनमध्ये नोंदणी ऑनलाईनही करता येईल. यासाठी धावपटूंनी पुढील वेबसाईटवर जावे. www.mahamarathon.com

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आॅरेंजसिटी’अशी ख्याती असलेल्या नागपूर शहरात येत्या ११ फेब्रुवारीला ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन होत आहे. लोकमत समूहातर्फे ऐतिहासिक शहर औरंगाबाद तसेच नाशिक येथील प्रचंड यशानंतर आता राज्याच्या उपराजधानीत महामॅरेथॉनचा थरार रंगणार आहे. नागपूर महामॅरेथॉनच्या नाव नोंदणीला सुरुवात झाली असून नोंदणी सुरू झाल्यापासून धावपटूंमध्ये नावनोंदणीसाठी चढाओढ सुरू आहे.नाशिकपासून यावर्षी ‘लोकमत महामॅरेथॉन’चा श्रीगणेशा झाला आहे. नाशिक येथील उदंड प्रतिसादानंतर औरंगाबाद येथे १७ डिसेंबर रोजी महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. आता ११ फेब्रुवारीला नागपुरात आयोजन होणार आहे. महामॅरेथॉनचा चौथा आणि अखेरचा टप्पा कोल्हापूर असेल. कोल्हापुरात १८ फेब्रुवारीला आयोजन होणार आहे.सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात ‘लोकमत’ने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. समाजात आरोग्य, फिटनेसविषयी जागरुकता निर्माण व्हावी आणि एकोपा वाढावा या उदात्त हेतूने ‘लोकमत’ समूहातर्फे महामॅरेथॉनचे आयोजन केले जात आहे. नाशिक तसेच औरंगाबादेत झालेल्या महामॅरेथॉनला क्रीडारसिक, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक व महिलांसह देश-विदेशातील धावपटूंचा उदंड प्रतिसाद लाभला होता. आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेल अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग झालेली ही अत्युच्च दर्जाची ‘लोकमत’ समूहाची मॅरेथॉन असल्याची धावपटूंची प्रतिक्रिया होती. भोजवानी फुडस् हे मुख्य प्रायोजक असून सहप्रायोजक कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर हे आहेत. आयोजनात मेघे ग्रूपचे नेल्सन मदर एण्ड चाईल्ड केअर हॉस्पिटलचे सहकार्य लाभले आहे.सहा लाखांहून अधिक रकमेची आकर्षक बक्षिसे२१ कि.मी. (अर्धमॅरेथॉन)फॅमिली रन (३ कि.मी.)५ कि.मी. फन रन१० कि.मी. पॉवर रन२१ कि.मी. डिफेन्स गटासाठी विशेष असे बक्षीस करंडकरूपाने दिले जाणार आहे.१० आणि २१ कि़मी.ची स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक धावपटूस त्या-त्या विभागाचा नकाशा असलेले मेडल्स दिले जाईल. नाशिक आणि औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या मॅरेथॉनमधील धावपटूंना मेडल देण्यात आले. आता असेच मेडल अन्य दोन (नागपूर तसेच कोल्हापूर) शहरांत होणाऱ्या महामॅरेथॉनमधील विजेत्यांना देखील मिळतील. धावपटूने चारही शहरांतील मॅरेथॉन पूर्ण करून मिळालेले मेडल्स जुळवल्यास, आपल्या ‘महाराष्ट्राचा’ नकाशा बनेल. नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर अशा चारही मॅरेथॉन जिंकून हे मेडल्स पटकावणारा धावपटू ‘महामॅरेथॉनर’ ठरणार आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा