शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

लोकमत इम्पॅक्ट : २२४ कोटी रुपयांच्या  एसएनडीएलच्या गोलमालची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 23:28 IST

महावितरणची फ्रेन्चाईजी कंपनी म्हणून काम केलेल्या एसएनडीएलवर थकीत २२४ कोटी रुपयाच्या ऑडिटमध्ये उशीर होत आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे.

ठळक मुद्देऊर्जामंत्र्यांनी घेतली दखल : दस्तावेज मागविले, ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणची फ्रेन्चाईजी कंपनी म्हणून काम केलेल्या एसएनडीएलवर थकीत २२४ कोटी रुपयाच्या ऑडिटमध्ये उशीर होत आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे. त्यांनी यासंदर्भात सर्व दस्तावेज मागितले असून, ऑडिट रिपोर्ट तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. लोकमतने गेल्या शुक्रवारच्या अंकात यासंदर्भात बातमी प्रकाशित केली होती. यानंतर महावितरणमध्ये खळबळ उडाली.शहरातील तीन डिव्हिजनची वीज वितरण यंत्रणा सांभाळणारी फ्रेन्चाईजी कंपनी एसएनडीएल जाऊन चार महिने पूर्ण झाले आहेत. परंतु अजूनही २२४ कोटी रुपयांचा हिशेब समोर येऊ शकलेला नाही. महाल, गांधीबाग आणि सिव्हिल लाईन्स डिव्हिजनचा कामकाज सांभाळणाऱ्या एसएनडीएलने आपल्या आर्थिक परिस्थितीचा हवाला देत कामकाज सुरू ठेवण्यास असमर्थता दर्शविली होती. त्यानंतर गेल्या वर्षी ९ सप्टेंबर रोजी महावितरणने तिन्ही डिव्हिजनचा कारभार आपल्या हाती घेतला. एक महिन्याच्या समानांतर कामकाजानंतर १० ऑक्टोबर रोजी महावितरणने पूर्णपणे ओव्हरटेक केले.या प्रक्रियेदरम्यान दोन्ही कंपन्यांच्या हिशेबाची खूप चर्चा झाली. महावितरणने एसएनडीएलवर २२५ कोटी रुपयाचे बिल थकीत असल्याचे सांगितले. दुसरीकडे एसएनडीएलने ६० कोटी रुपयाचे घेणे असल्याचे सांगितले. यादरम्यान महावितरणने एसएनडीएलची १०० कोटीची बँक गँरटी जप्त केल्याचा दावा करीत त्यांना केवळ १ ते २ कोटी रुपयेच घ्यायचे असल्याचे सांगितले. परंतु १२५ कोटी रुपयाची थकीत रक्कम कशी काय घेण्यात आली, याचा खुलासा महावितरणने मात्र केला नाही, खरे काय आहे हे पुढे यावे म्हणून तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन महिन्यात ऑडिट करण्याचे निर्देश दिले होते. परंतु चार महिन्यानंतरही काम पूर्ण झालेले नाही.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूरNitin Rautनितीन राऊत