शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट : परीक्षा केंद्रावर जा, कॉपी रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 22:14 IST

बारावीची परीक्षा सुरू झाली. काही केंद्रांवर कॉपी होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. या तक्रारींची नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. नागपूर विभागीय कार्यालयाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी सर्व भरारी पथकांच्या प्रमुखांना पत्र पाठवून परीक्षा केंद्रांना भेटी देऊन कॉपीचे प्रकार रोखण्याचे निर्देश दिले आहेत. सोबत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचत्या सूचनाही दिल्या आहेत.

ठळक मुद्देबोर्डाच्या विभागीय अध्यक्षांचे आदेश : भरारी पथकांना दिले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बारावीची परीक्षा सुरू झाली. काही केंद्रांवर कॉपी होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. या तक्रारींची नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. नागपूर विभागीय कार्यालयाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी सर्व भरारी पथकांच्या प्रमुखांना पत्र पाठवून परीक्षा केंद्रांना भेटी देऊन कॉपीचे प्रकार रोखण्याचे निर्देश दिले आहेत. सोबत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचत्या सूचनाही दिल्या आहेत.बोर्डाची बारावीची परीक्षा गुरुवारपासून सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर होता. या पेपर दरम्यान कॉपीचे प्रकार झाल्याच्या तक्रारी होत्या. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी विभागात कॉपीवर आळा घालण्यात आल्याचा दावा केला होता. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर बोर्डाचे अध्यक्ष देशपांडे यांनी भरारी पथकांना संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुपारनंतर सर्व पथकाच्या प्रमुखांना पत्र पाठविण्यात आले. देशपांडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, बोर्डाने परीक्षा शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे. कॉपीला आळा घालण्यासाठी व्यापक प्रमाणात तयारी केली आहे. त्यासाठी भरारी पथक नेमले आहेत. या पथकांना परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये यासाठी अधिकाधिक परीक्षा केंद्राचे निरीक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.परीक्षा अगदी सुरळीत पार पडलीनागपूर : परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणत्याच केंद्रावर कोणत्याही प्रकारच्या उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका कमी पडल्या नाहीत. तसेच उत्तर पत्रिका व प्रश्नपत्रिका कमी पडल्याच्या तक्रारी आमच्या कार्यालयास प्राप्त झाल्या नाहीत. साहित्याची मागणी विभागीय मंडळाकडे प्राप्त झाली नाही किंवा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या आहेत. सर्व केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली आहे. रविकांत देशपांडे,अध्यक्ष, नागपूर विभागीय मंडळ

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा