शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

निरंतर लोकजागराचा आज विदर्भामध्ये सुवर्णमहोत्सव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 07:21 IST

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते डिजिटल अंकाचे प्रकाशन

नागपूर : विदर्भाच्या मातीतून जन्मलेले आणि गेली सलग ५० वर्षे निरंतर लोकजागरासाठी वाहून घेतलेले ‘लोकमत’ आज सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. या वर्धापन दिनानिमित्त लाखो नागपूरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणपतीच्या चरणी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता ५० किलोचा लाडू अर्पण केला जाणार आहे. १५ डिसेंबर १९७१ रोजी स्वातंत्र संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी यांनी नागपुरातून ‘लोकमत’ची मुहूर्तमेढ रोवली. यवतमाळच्या मातीतून रुजलेले हे रोपटे ५० वर्षांत वटवृक्षात रूपांतरित झाले. महाराष्ट्रभर त्याच्या पारंब्या पसरल्या. वितरणापासून तर सुबक अंक-छपाईपर्यंतचे सर्व विक्रम तोडून लोकमत ‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ झाले. समाजाच्या संवेदना टिपत महाराष्ट्रव्यापी झालेला लोकमत आणि वाचकांसाठी हा आनंदाचा दिवस आहे. विदर्भात सजणार रांगोळ्या ‘लोकमत’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लोकमत सखी मंच आणि प्रेरणा सेवा मंडळ संचालित प्रेरणा इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने १५ डिसेंबरला बुधवारी विदर्भस्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे. विदर्भातील महिला, युवती आणि सखी मंचच्या सदस्या यात सहभागी होत असून जणू विदर्भाचे अंगणच या स्पर्धेतून मनमोहक रांगोळ्यांनी सजणार आहे. ‘लोकमत सुवर्ण महोत्सव १९७१-२०२१’ असा उल्लेख करून आणि त्यावर एक पणती लावून विदर्भातील भगिनीही या निरंतर लोकजागराचा आज विदर्भामध्ये सुवर्णमहोत्सव ! आनंदोत्सवात सहभागी होत आहेत.

सर्वधर्म समभाव परिषदसुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या अंतर्गत सामाजिक सद्भावनेचा संदेश देत नागपुरात २५ ऑक्टोबरला ‘लोकमत राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद’ आयोजित करण्यात आली होती. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर, पतंजली योगपीठाचे संस्थापक बाबा रामदेव, नवी दिल्ली येथील अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी, बीएपीएस स्वामी नारायण संस्थेचे धर्मगुरू ब्रह्मविहारी स्वामी, मुंबईचे आर्चबिशप कार्डिनल्ड ओसवाल्ड ग्रेसियस, जीवन विद्या मिशनचे संस्थापक प्रल्हाद वामनराव पै, लेह-लडाख येथील महाबोधी आंतराष्ट्रीय तपसाधना केंद्राचे संस्थापक भिक्खू संघसेना या जागतिक पातळीवरील धर्मगुरूंनी ‘धार्मिक सौहार्दाबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर झालेल्या परिसंवादातून देशाला सामाजिक सद्भावनेचा संदेश दिला होता. 

टॅग्स :LokmatलोकमतAnurag Thakurअनुराग ठाकुर