शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Deepotsav 2021 : ‘लोकमत दीपोत्सव’ आला! दिवाळीचे दिवे लागण्याआधी मान्यवरांच्या हस्ते नागपूरमध्ये समारंभपूर्वक प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 08:32 IST

Lokmat Deepotsav 2021 :  ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत उपस्थित महानुभावांच्या हस्ते यावर्षीच्या ‘दीपोत्सव’चं शानदार प्रकाशन झालं आणि एक संपन्न वाचन-मैफल दर्दी वाचकांसाठी सुरू झाली.

नागपूर : आवर्जून वाचावं असं मराठीत काही लिहिलंच जात नाही, लिहिलं तर कुणी वाचत नाही, काही वाचायला हल्ली वेळ कुठे असतो कुणाकडे?... अशा सगळ्या नकारघंटांना खणखणीत उत्तर देत तीन लाख प्रतींच्या वितरणाचा पल्ला गाठणारा ‘दीपोत्सव’ हा  ‘लोकमत’चा बहुचर्चित दिवाळी अंक यावर्षी दिवाळीचे दिवे लागण्याआधीच सर्वत्र उपलब्ध झाला आहे. ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत उपस्थित महानुभावांच्या हस्ते यावर्षीच्या ‘दीपोत्सव’चं शानदार प्रकाशन झालं आणि एक संपन्न वाचन-मैफल दर्दी वाचकांसाठी सुरू झाली.

हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन श्रीकांत दातार यांची सखोल मुलाखत, ‘पोलीस’ नावाच्या एका खदखदत्या जंगलात फिरून केलेली मुशाफिरी, शरीर व्यवहारांच्या नग्न व्यापाराने गजबजलेल्या पोर्न फिल्म्सच्या चोरट्या जगाच्या खिडक्या उघडणारा विशेष रिपोर्ताज आणि आकाराला येत असलेल्या राममंदिराच्या बरोबरीने बदलणाऱ्या, न बदलणाऱ्या जुन्या-नव्या अयोध्येच्या भटकंतीत भेटलेल्या माणसांची सचित्र कहाणी हे यंदाच्या दीपोत्सवाचे काही खास आकर्षण बिंदू आहेत.

दोन वर्षांच्या कोविड काळाने सटपटलेल्या मनांना दिलासा देणाऱ्या काही विशेष लेखांचा खास विभाग - ए जिंदगी, गले लगा ले! - या अंकाचं संदर्भमूल्य वाढवतो. कोरोनाच्या आधीही माणसाच्या तगून राहण्याच्या क्षमतेची परीक्षा पाहणारे अनेक कालखंड येऊन गेले. त्यांच्या खिडक्या उघडून पाहणारी ही विशेष लेखमाला यावर्षीच्या दीपोत्सवाचे सूत्र आहे.

अंकाच्या प्रती सर्वत्र उपलब्ध होत असून आपल्या वृत्तपत्र विक्रेत्यांशी संपर्क साधून वाचकांना आपली प्रत आरक्षित करता येऊ शकेल.अंकाविषयी अधिक माहिती आणि ऑनलाइन खरेदीसाठी : deepotsav.lokmat.com ला भेट द्यावी. 

टॅग्स :lokmat deepotsavलोकमत दीपोत्सवLokmatलोकमत