शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

लोकमत ‘अ‍ॅस्पायर’ हाऊसफुल्ल

By admin | Updated: June 5, 2016 02:54 IST

लोकमत समूहातर्फे रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये ३ जूनपासून आयोजित ‘अ‍ॅस्पायर’ या तीन दिवसीय

नामांकित शैक्षणिक संस्थांच्या स्टॉलवर पालक, विद्यार्थ्यांची गर्दी : एकाच छताखाली संपूर्ण माहितीनागपूर : लोकमत समूहातर्फे रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये ३ जूनपासून आयोजित ‘अ‍ॅस्पायर’ या तीन दिवसीय शैक्षणिक प्रदर्शनात दुसऱ्या दिवशी पालक आणि विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होती. सर्व शैक्षणिक संस्थांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे पर्याय निवडीसाठी शहरातील कॉलेज वा शैक्षणिक संस्थांना भेट देण्याची गरज भासणार नाही. अशा प्रदर्शनाचे आयोजन लोकमतने वर्षातून दोनदा करावे, अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांनी केली.विद्यार्थ्यांना दिशा देणारे ‘करिअर गायडन्स सेमिनार’‘लोकमत’च्या शैक्षणिक प्रदर्शनात ‘करिअर गायडन्स सेमिनार’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअरची दिशा दाखविली जात आहे. रविवार ५ जून रोजी दुपारी ४ वाजता ‘करिअर इन योगा’ या विषयावर डॉ. विद्या लांजेवार, सायं. ५ वाजता ‘करिअर इन रेडिओ’ या विषयावर आरजे प्रियंका आणि माही (रेडिओ एफएम), सायं. ६ वाजता ‘सेशन फॉर बेटर लाईफ’ या विषयावर मनीष नायर तर सायं. ७ वाजता ‘करिअर इन कॉमर्स-कंपनी सेके्रटरी’ या विषयावर तुषार पहाडे मार्गदर्शन करतील. प्रदर्शनात शैक्षणिक क्षेत्राची इत्थंभूत माहितीप्रदर्शनात देशविदेश आणि प्रत्येक राज्यातील शैक्षणिक उपक्रमांची इत्थंभूत माहिती भविष्यात शैक्षणिक प्रगतीची दिशा देणारी असल्याची प्रतिक्रिया पालक आणि विद्यार्थ्यांनी लोकमतशी बोलताना दिली. पालक विश्वास वरघडे म्हणाले, लोकमतने असे शैक्षणिक प्रदर्शन वर्षांतून दोन भरवावे. त्यामुळे बदलत्या शैक्षणिक घडामोडीची माहिती विद्यार्थ्यांनी एकाच छताखाली उपलब्ध होते. शनिवारी झालेल्या चर्चासत्राच्या माध्यमातून इंजिनिअरिंग आणि मेडिकल स्पर्धा परीक्षांची माहिती मिळाली. प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. विवेक नानोटी आणि स्नेहा समूहाचे चेअरमन प्रा. रजनीकांत बोंद्रे यांनी शैक्षणिक क्षेत्रात निरंतर होणाऱ्या बदलांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी क्षेत्र निवडून करिअर घडविण्याचे त्यांनी आवाहन केले. ते विद्यार्थ्यांना दिशा देणारे होते.

शैक्षणिक क्षेत्रात निरंतर बदल नकोयावर्षी वैद्यकीय क्षेत्रातील केंद्रीय नीट परीक्षेच्या निरंतर बदलत्या परीक्षा सत्रांमुळे विद्यार्थ्यांना त्रास झाला. नीट वा राज्याच्या परीक्षेवर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. याशिवाय कोचिंग क्लासेसने वारेमाप फी आकारली. दहावीतून अकरावीत गेलेल्या विद्यार्थ्यानी पुढील दोन वर्षांत काय करावे, यासाठी परीक्षेच्या तारखांची घोषणा पूर्वीच केली तर विद्यार्थी लक्ष अभ्यासावर केंद्रित करू शकतो, असे मत सुयश देवधर, श्रीकांत जीवतोडे, संदेश सरोदे या विद्यार्थ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. लोकमतचे प्रदर्शन खरोखरंच शैक्षणिक उपक्रमांना उजाळा देणारे आणि करिअर घडविण्यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅस्पायर प्रदर्शनामुळे इतरत्र जाण्याची गरज भासली नाही, अशी प्रतिक्रिया देवकी साधू हिने यावेळी दिली.स्टॉलची आगळीवेगळी वैशिष्ट्येप्रदर्शनात मुंबई, पुणे, मराठवाडा आणि विदर्भातील नामांकित शैक्षणिक संस्थांचे स्टॉल आहेत. सर्व स्टॉलवर शाळा व महाविद्यालयांची माहिती, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट, फॅशन, ग्राफिक्स, इंटेरियर डिझाईन, रिटेल, आयटीआय, एव्हिएशन, मीडिया, अ‍ॅनिमेशन, व्यावसायिक क्लासेस, प्रोफेशनल क्लासेस, हॉटेल मॅनेजमेंट, विदेशी भाषा, पॉलिटेक्निक, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट आदींची माहिती उपलब्ध आहे. शिक्षण व करिअरचे सर्वोत्तम पर्याय असून सर्वांगीण सल्ला विद्यार्थ्यांना मिळत आहेत. याशिवाय बदलत्या परिदृश्यात ग्लोबल करिअरच्या अजोड संधीची माहिती प्रदर्शनात आहेत. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दहावी आणि बारावीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा दररोज सत्कार करण्यात येत आहे. तसेच प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना आकर्षक बक्षिसांसह मोबाईल जिंकण्याची संधी आहे.