शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महानिर्मितीची भरती नियमानुसारच : बावनकुळे यांच्याविरोधातील तक्रार लोकायुक्तांनी फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 17:18 IST

महानिर्मितीच्या  कोराडी येथील औष्णिक केंद्रात झालेल्या भरती प्रकरणी राज्याचे उजार्मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लोकायुक्तांकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

 नागपूर  - महानिर्मितीच्या  कोराडी येथील औष्णिक केंद्रात झालेल्या भरती प्रकरणी राज्याचे उजार्मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लोकायुक्तांकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरोधातील तक्रार राज्याच्या लोकायुक्तांनी फेटाळून लावली आहे. ही भरती नियमानुसारच झाली असून उमेदवारांची सर्व प्रमाणपत्रे वैध असून यात परत चौकशीची आवश्यकता नाही, असा निर्वाळा लोकायुक्त न्यायमूर्ती एम. एल.  टहलियानी यांनी दिला.महादुला नगरपंचायतचे श्रीधर साळवे व सुनील साळवे यांनी यासंदर्भात लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. कोराडी वीज केंद्रातील भरतीमध्ये गैरव्यवहार झाला असून बावनकुळे यांनी आपल्या कुटुंबातील लोकांना नोकरीवर लावले असल्याचे आरोप केले होते. या तक्रारीनुसार सुनावणी करून सर्व बाजू तपासल्यानंतर लोकायुक्त न्या. टहलियानी यांनी उपरोक्त आदेश देत तक्रार अर्ज फेटाळून लावला. त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, या सुनावणीमध्ये याप्रकारच्या तक्रारीची काहीही गरज नव्हती. यासंदर्भात नागपूरचे उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांनी सादर केलेला संपूर्ण अहवाल मी वाचला आहे. रेकॉर्डमध्येही आहे.  लावण्यात आलेले सर्व आरोप त्यांच्या अहवालानुसार तथ्यहिन आहेत. हा प्रकार १९९१ ते १९९६ दरम्यानचा आहे. अशा प्रकारच्या प्रकरणात घटनेच्या तीन वर्षापर्यंत तक्रार केल्यास विभागीय आयुक्त त्याची दखल घेतात. या तक्रारीनुसार अशी दोनच प्रकरणे आढळून आली. यातील दोन्ही प्रमाणपत्रे ही स्थानांतर प्रमाणपत्रे होती. प्रकल्पग्रस्त व्यक्तींच्या प्रमाणपत्राचे स्थानांतर हे मूळ व्यक्तीच्या विनंतीअजार्नंतरच करण्यात आले होते. अशा प्रकारे प्रमाणपत्राचे स्थानांतर करणे यात गैर काहीच नाही.त्याचप्रमाणे लोकायुक्तांनी या प्रकरणात सर्व प्रमाणपत्रांची तपासणी झाली असल्याकडेदेखील लक्ष वेधले. उपजिल्हाधिकºयांनी ही सर्व प्रक्रिया पार पाडली. त्यातही चुकीचे असे काहीच आढळून आले नाही.  रोजगार देणाºया   एजन्सीलासुद्धा  दोषी धरता येणार नाही. कारण त्यांनी महसूल विभागाने जारी केलेल्या प्रमाणपत्रांच्या आधारावर रोजगार दिला. त्यामुळे चौकशीची गरज नाही. राहिला मुद्दा बावनकुळे यांच्या संपत्तीचा तर त्यांच्या संपत्तीची वाटणी झाली आहे. त्यांना प्रत्येकाला वेगवेगळा प्रकल्पग्रस्त म्हणून मोबदलाही मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीवर प्रश्न उपस्थित करता येत नाही. एकूणच जे काही अहवाल मिळाले ते समाधानकारक असून पुढे या प्रकरणाची चौकशी करता येणार नाही, असेदेखील लोकायुक्तांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMaharashtraमहाराष्ट्र