शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेचा उमेदवार नागपूर शहर काँग्रेस मार्फत ठरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:47 IST

लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसमधील असंतुष्ट गटाने लोकसभेच्या उमेदवारीसाठी दिल्लीत फिल्डिंग लावली असताना दुसरीकडे मुत्तेमवार- विरोधी ठाकरे गटाने उमेदवारी आपल्याच गटाकडे कायम ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या शहर काँग्रेसने शुक्रवारी लोकसभेचा उमेदवार शहर काँग्रेस मार्फतच ठरावा, असा ठराव घेतला. संबंधित ठराव प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबैठकीत ठराव : प्रदेश काँग्रेसला पाठविणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसमधील असंतुष्ट गटाने लोकसभेच्या उमेदवारीसाठी दिल्लीत फिल्डिंग लावली असताना दुसरीकडे मुत्तेमवार- विरोधी ठाकरे गटाने उमेदवारी आपल्याच गटाकडे कायम ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या शहर काँग्रेसने शुक्रवारी लोकसभेचा उमेदवार शहर काँग्रेस मार्फतच ठरावा, असा ठराव घेतला. संबंधित ठराव प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांना लोकसभेची उमेदवारी मिळू नये, यासाठी विरोधी गट सक्रिय झाला आहे. दिल्लीत वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेऊन ते आपली बाजू मांडत आहेत. अशातच आता मुत्तेमवार- ठाकरे गटाने शहर काँग्रेसच्या संमतीनुसार उमेदवार ठरावा, असा ठराव घेऊन असंतुष्ट गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. बैठकीत ठाकरे म्हणाले, शहर काँग्रेसतर्फे बूथ कमिट्या तयार करण्यात आल्या आहेत. स्वत:च्या प्रसिध्दीकरिता काही नेते पक्षांच्या कार्यकर्त्यांचे पाठबळ नसतानाही लोकसभेच्या उमेदवारीवर दावा करीत आहेत. मात्र, लोकसभेचा उमेदवार शहर काँग्रेस समिती मार्फत शिफारस केलेलाच असावा. अशा आशयाचाप्रस्ताव त्यांनी मांडला. यावर उपस्थित पदाधिकारी यांनी लोकसभेसाठी सक्षम, कुशल व अनुभवी व्यक्ती असायला पाहिजे, असे मत व्यक्त केले व ठराव मंजूर केला.बैठकीत जनसंपर्क अभियानाची माहिती देण्यात आली. १८ ते २१ वयोमर्यादेच्या युवकांना लक्षात घेऊन पक्ष सदस्यता अभियान राबविणे. स्थानिक परिस्थिती आणि माहितीचे संकलन करणे. प्रत्येक बूथवर बूथ सहयोगी तयार करणे. पक्षाकरिता निधी संकलन करणे. या सर्व बाबी राबविण्याकरिता शहरातील सहाही विधानसभानिहाय एकूण ३१ लोकांची कमिटी स्थापन करण्याचे निर्देश दिले. बैठकीला अ‍ॅड.अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, उमेश शाहू, संजय महाकाळकर, बंडोपंत टेभुर्णे, प्रा.दिनेश बानाबाकोडे, डॉ.गजराज हटेवार, जयंत लुटे, राजेश कुभलकर, राजू गोतमांगे आदी उपस्थित होते.विशाल मुत्तेमवार चंद्रपूरचे प्रभारीकाँग्रेसच्या चंद्रपूर शहर आणि जिल्हा प्रभारीपदी युवा नेते विशाल मुत्तेमवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी विविध राज्यातील निवडणुकीत पक्षातर्फे सोपविण्यात आलेली जबाबदारी पार पाडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घ्याव्या, जनसंपर्क अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन करण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी त्यांच्यावर सोपविली आहे. यापूर्वी जिल्हाप्रभारी म्हणून नेमण्यात आलेले शकूर नागाणी यांच्यासह विशाल यांना आता संयुक्तपणे काम करायचे आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर