शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
4
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
5
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
6
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
7
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
8
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
9
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
10
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
11
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
12
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
13
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
14
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
15
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
16
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
17
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
18
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
19
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
20
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण

Lok Sabha Election 2019; ‘व्हॉटस्अ‍ॅप’ प्रचारावर ‘कंट्रोल’च नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 10:32 AM

यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये कधी नव्हे ते ‘सोशल मीडिया’ला उमेदवारांकडून जास्त महत्त्व देण्यात येत आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘फेसबुक’सह विविध माध्यमांतून प्रचार करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे मुदत संपल्यानंतरदेखील प्रचार सुरूच राहणार तपासणी यंत्रणाच नाही

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये कधी नव्हे ते ‘सोशल मीडिया’ला उमेदवारांकडून जास्त महत्त्व देण्यात येत आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘फेसबुक’सह विविध माध्यमांतून प्रचार करण्यात येत आहे. उमेदवारांच्या ‘सोशल मीडिया’वरील प्रचारावर बारीक लक्ष ठेवणार असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. मात्र प्रत्यक्षात ‘व्हॉट्सअ‍ॅप’सारख्या ‘अ‍ॅप’वरील प्रचारावर नजर ठेवण्यासाठी ‘सायबर सेल’ तसेच आयोगाकडे यंत्रणाच उपलब्ध नाही. अशा स्थितीत पहिल्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर मतदानापर्यंत नियमांना धाब्यावर बसवून ‘सोशल मीडिया’वर प्रचाराचा धुरळा उडतच राहण्याची चिन्हे आहेत. या प्रचारावर आयोग लक्ष ठेवणार तरी कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.निवडणुकांत उमेदवारांच्या ‘सोशल मीडिया’वरील प्रचारावर बारीक नजर राहणार असल्याचा इशारा निवडणूक आयोगाने दिला होता. यासंदर्भात लक्षदेखील ठेवण्यात येत असून त्याच्या खर्चाची आकडेवारीदेखील उमेदवार आयोगाकडे सादर करत आहेत. विविध संकेतस्थळांसोबतच ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर सर्वात जास्त प्रचार होताना दिसून येत आहे. या माध्यमातून एकाच वेळी कमी खर्चात जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचणे शक्य असल्याने अनेक उमेदवारांची प्रचार यंत्रणा यावर भर देत आहे. उमेदवारांच्या ‘सोशल मीडिया हॅडलर्स’ तसेच कार्यकर्त्यांकडून विविध ‘ग्रुप’ तयार करण्यात आले आहे व दररोज शहरातील लाखो लोकांपर्यंत विविध ‘ग्रुप्स’च्या माध्यमातून संदेश पोहोचत आहेत. निवडणूक आयोगाने ‘सोशल मीडिया’वरील प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे.मात्र ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील संदेशांची चाचपणी करणे ही कठीण बाब आहे. शिवाय उमेदवारांचे कार्यकर्ते, प्रचार यंत्रणा लक्षात घेता प्रत्येकाच्या फोनमधील ‘व्हॉट्सअ‍ॅप’ची तपासणी करणे शक्यच नाही. ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर नेमक्या कुठल्या संदेशांची देवाणघेवाण होत आहे, यावर लक्ष ठेवण्याची यंत्रणा आयोगाकडे नाही. मात्र प्रचार यंत्रणेतून, कार्यकर्ते, नातेवाईक यांच्या माध्यमातून ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर प्रचाराची रणधुमाळी सुरूच राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘सायबर सेल’च्या उपायुक्त श्वेता खेडकर यांना संपर्क केला असता त्या बैठकीत असल्याने त्यांनी बोलण्यास नकार दिला.

‘व्हॉटस्अ‍ॅप’वरील संदेश पाहणे अशक्य‘फेसबुक’, ‘टिष्ट्वटर’ इत्यादी ‘सोशल मीडिया’ हे खुल्या ‘प्लॅटफॉर्म’वर असतात. म्हणजेच कुणीही यावरील संदेश, माहिती पाहू शकतो. मात्र ‘व्हॉटस्अ‍ॅप’वरील संदेश ही अशक्य बाब आहे. ‘व्हॉटस्अ‍ॅप’वरील व्यक्तिगत संदेश हे ‘एन्ड टू एन्ड एनक्रिप्शन’ने संरक्षित केले असतात. म्हणजेच संदेश पाठविणारा व ज्याच्या क्रमांकावर संदेश जात आहे याव्यतिरिक्त इतर व्यक्ती हे संदेश पाहू शकत नाही. शिवाय एखाद्या उमेदवाराच्या नावाने एकाहून जास्त ‘सीमकार्ड’ व स्मार्टफोन असतील तर एकाच वेळी अनेक ‘व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप’ तो तयार करू शकतो. अशा स्थितीत मतदानाच्या दिवशी प्रचार सुरू असला तरी त्याला ‘ट्रॅक’ करू शकणार नाही, असे मत सायबर तज्ज्ञ अ‍ॅड. महेंद्र लिमये यांनी व्यक्त केले.पोलिसांकडेही यंत्रणा नाहीनागपूर पोलिसांच्या ‘सायबर सेल’कडे एखाद्याच्या ‘व्हॉटस्अ‍ॅप’वरून किती संदेश चालले आहे, हे सांगणारी यंत्रणा उपलब्ध नाही. केवळ एखाद्या ‘ग्रुप’वर संदेश आला असेल आणि आपला क्रमांक त्यात असेल तर कुणी संदेश पाठविला, हे कळू शकते. मात्र प्रत्यक्ष वैयक्तिक क्रमांकाचे ‘ट्रॅकिंग’ करणे शक्य नसल्याचे ‘सायबर सेल’चे ‘एपीआय’ विशाल माने यांनी स्पष्ट केले. मात्र ‘बल्क एसएमएस’कडे आमचे पूर्ण लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWhatsAppव्हॉटसअ‍ॅप