लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: आम्ही खूप सामान्य लोक. तसा प्रत्यक्ष आमचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. पण रस्त्यावर पोट भरणाऱ्यांना सुरक्षितता हवी एवढे मात्र वाटते, असे मत नागपुरातील भाजी विक्रेते रमेश काळमेघ यांनी व्यक्त केले आहे. ते पुढे म्हणतात, निवडणुका या खऱ्या अर्थाने राजकारणी माणसांचे काम आहे. माझ्या एकट्याच्या मताने कुणी निवडून येईल अथवा पडेल असेही नाही. पण निवडणुकीत मतदान करणे ही जबाबदारी आहे. ती पार पाडणे माझे कर्तव्य आहे. तसे सरकार कुठलेही असो कोणत्याही पक्षाचे असो. सामान्य माणसाच्या अपेक्षा अतिशय सामान्य असतात. मी भाजीचा व्यवसाय बऱ्याच वर्षांपासून करतोय. पूर्वी एकटा होतो, आता कुटुंब वाढले आहे. पूर्वी जेवढी कमाई करायचो, आजही तेवढीच करतो आहे. पण मुलांचे शिक्षण, आरोग्य, त्यांच्या भविष्याच्या चिंता वाढल्या आहेत. आमच्यासारख्या अतिसामान्य लोकांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी सरकारने योजना राबविल्या पाहिजे. रस्त्यावर पोट भरणाऱ्यांना सुरक्षितता दिली पाहिजे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी जे सरकार त्यांच्या गरजा लक्षात घेऊन उपाययोजना करते ते सरकार खरे जनतेचे सरकार असते. आम्हाला अशा सरकारची अपेक्षा आहे.
Lok Sabha Election 2019; रस्त्यावर पोट भरणाऱ्यांना हवी सुरक्षितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 10:57 IST
आम्ही खूप सामान्य लोक. तसा प्रत्यक्ष आमचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. पण रस्त्यावर पोट भरणाऱ्यांना सुरक्षितता हवी एवढे मात्र वाटते, असे मत नागपुरातील भाजी विक्रेते रमेश काळमेघ यांनी व्यक्त केले आहे.
Lok Sabha Election 2019; रस्त्यावर पोट भरणाऱ्यांना हवी सुरक्षितता
ठळक मुद्देअपेक्षा सामान्यांच्या