शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

Lok Sabha Election 2019; निवडणूक ‘प्लॅन’साठी पोलिसांची ‘फिल्डिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:11 IST

निवडणुकीच्या रणधुमाळीत काही उपद्रवी तत्त्व आपत्तीजनक माहिती आणि अफवा पसरवून वाद उभा करण्याच्या कामात गुंतले आहे. पोलिसांनी याला पद्धतशीरपणे हाताळण्यासाठी ‘फुल प्रूफ फिल्डींग’ लावली आहे.

ठळक मुद्देवादग्रस्त नेत्यांवर राहणार कडक नजरविशेष टीम गठित

जगदीश जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीच्या रणधुमाळीत काही उपद्रवी तत्त्व आपत्तीजनक माहिती आणि अफवा पसरवून वाद उभा करण्याच्या कामात गुंतले आहे. हा त्यांच्या निवडणुकीच्या ‘प्लॅन‘चा एक भाग असू शकतो असा पोलिसांना संशय आहे. या माध्यमातून शहरातील कायदा व सुव्यवस्थेत बाधा निर्माण केली जाऊ शकते. त्यामुळे शहर पोलिसातही खळबळ उडाली आहे. तेव्हा पोलिसांनी याला पद्धतशीरपणे हाताळण्यासाठी ‘फुल प्रूफ फिल्डींग’ लावली आहे.गेल्या आठवड्यात पोलिसांसमोर दोन वाद आलेत. पहिले प्रकरण धंतोली येथील बचत भवनातील स्ट्राँग रुमशी संबंधित होते. स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम मशीन ठेवताना सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणे आणि अज्ञात व्यक्तीद्वारा मोबाईल क्लिपींग तयार करण्याचे प्रकरण होते. या प्रकरणात काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे तक्रार केली आहे. या आधारावर तहसीलदाराने तक्रार केली असून धंतोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या तपासात खरा प्रकार उघडकीस आला आहे. उमेदवाराच्या जवळच्या व्यक्तीनेच ही क्लिपींग बनवल्याची बाब उघडकीस आली आहे. लोकमतने मंगळवारी हा प्रकार समोर आणताच शहर पोलीस आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.दुसरे प्रकरण पीरिपाचे नेते जयदीप कवाडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याचे होय. या प्रकरणामुळेही भाजपसह महिलांमध्ये तीव्र रोष आहे. दोन्ही प्रकरणाचे आकलन केल्यानंतर पोलीस ‘हाय अलर्ट’वर आहे. ११ एप्रिल रोजी शहरात मतदान आहे. ९ एप्रिल रोजी प्रचार तोफा थंडावणार आहेत. पोलिसांना असा संशय आहे की, मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने उपद्रवी तत्त्व शांतता भंग करण्याचे काम करीत आहेत. ते अफवांना अधिक पसरवित प्रशासन आणि निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि वाद निर्माण होऊ शकतात. कायदा -सुव्यवस्थेत बाधा निर्माण करण्यासाठीच दुष्प्रचाराचा आसरा घेतला जात आहे. याला रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांनी सायबर सेलसोबतच गुप्त नेटवर्कलाही अलर्ट केले आहे. यासाठी विशेष टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम नेता आणि त्याच्याशी संबंधित लोकांवर नजर ठेवून आहे. पोलिसांनी वादग्रस्त नेत्यांची एक यादी तयार केली आहे. त्यांच्या पार्श्वभूमीच्या आधारावर आवश्यक पाऊल उचलले जात आहे.

अफवा पसरवणाऱ्यांना सोडणार नाहीसध्याच्या परिस्थितीशी पोलीस अवगत आहेत. पोलिसांनी प्रत्येक स्तरावर अशा लोकांशी निपटण्याची योजना तयार केली आहे. त्यांची ओळख करून योग्य बंदोबस्त केला जाईल. अफवा पसरवून निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण करणाऱ्या नेत्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. काही भागात विशेष दक्षता बाळगली जात आहे. सायबर सेललाही सक्रिय करण्यात आले आहे. ते सोशल मीडियासह इतर माध्यमांवर नजर ठेवत आहे.- डॉ. भूषणकुमार उपाध्यायपोलीस आयुक्त, नागपूर शहरभाषणांवरही लागले कानजयदीप कवाडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पोलीस नेत्यांची भाषणे आणि त्यांनी केलेल्या वक्तव्यावरही नजर ठेवून आहेत. नागरिकांमध्ये द्वेष आणि असंतोष निर्माण करणाºया नेत्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे पोलिसांनी ठरवले आहे. पोलिसांना असा संशय आहे की, येणाºया दिवसात हा प्रकार आणखी वाढू शकतो. काही नेते अशा भाषणातूनच परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करू इच्छितात, अशा नेत्यांवर पोलिसांची कडक नजर आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019