शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

Lok Sabha Election 2019; ‘सी-व्हिजिल अ‍ॅप’ ठरतेय प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 10:58 IST

यंदा ऑनलाईन तक्रारी नोंदविण्यासाठी ‘सी-व्हिजिल अ‍ॅपह्ण तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार नोंदविता येत असून, संबंधिताचे नावही समोर येत नाही.

ठळक मुद्दे ७२ तक्रारींपैकी ७१ निकालीप्रत्येक तक्रारीचे तत्काळ निवारण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीच्या काळात आचारसंहिता भंगाची अनेक प्रकरण होतात. नागरिकांच्या तक्रारीनंतरही प्रशासनाकडून त्याची दखलच घेतली जात नव्हती. अनेकजण तक्रारी नोंदविण्यास भीत असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनात आले. त्यामुळे यंदा ऑनलाईन तक्रारी नोंदविण्यासाठी ‘सी-व्हिजिल अ‍ॅपह्ण तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार नोंदविता येत असून, संबंधिताचे नावही समोर येत नाही.या अ‍ॅपच्या माध्यमातून आतापर्यंत ७२ तक्रारी प्राप्त झाल्या असून, यातील ७१ तक्रारींवर आवश्यक कारवाई करण्यात आली. त्यामुळे हे अ‍ॅप नागरिकांसह निवडणूक विभागासाठीही प्रभावी ठरले आहे.भारतीय निवडणूक आयोगाने नागरिकांसाठी ‘सी-व्हिजिल अ‍ॅप उपलब्ध करून दिले असून, नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेले बॅनर व फ्लेक्स असल्याबाबत सी-व्हिजिल अ‍ॅपवरून ७२ तक्रारी केल्या आहेत. या तक्रारी बॅनर, पोस्टरशी संबंधित आहेत.आदर्श आचारसंहिता भंग होत आहे, असे नागरिकांना वाटत असल्याचे त्यांनी त्या घटनेचे एक छायाचित्र अथवा व्हिडिओ रेकॉर्ड करून अपलोड करायचा आहे. त्यानंतर तक्रार करणाऱ्या नागरिकांच्या मोबाईलवर एक युनिक आयडी प्राप्त होतो. नागरिक अशाप्रकारे आचारसंहितेसंदर्भातील घटना नोंदवू शकतात.नागरिकांनी तक्रार नोंदविल्यानंतर ती अवघ्या पाच मिनिटात जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त होते. त्या माहितीच्या आधारे तक्रारीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या एसएसटी, व्हीएसटी आणि भरारी पथकाकडे ही तक्रार पाठविण्यात येते. त्यानंतर जीव्हीआयजी, आयएल अन्वेषक या जीआयएस आधारित मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या साहाय्याने संबंधित पथक घटनास्थळावर अवघ्या पाच मिनिटात पोहोचणे अपेक्षित आहे.संबंधित तक्रारीबाबत प्राथमिक तपास व तक्रारींच्या तथ्यांची तपासणी करून यासंबंधीचा अहवाल या अ‍ॅपद्वारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे पाठवला जातो.एकूणच नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेतली जात असून कारवाई सुद्धा होत असल्याने नागरिकांकडून या अ‍ॅपला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. दुसरीकडे नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने निवडणूक विभागासाठीसुद्धा हे अ‍ॅप प्रभावी ठरत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक