शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात टोळधाडीचा प्रवेश; शेतकरी भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 17:41 IST

सोमवारी  दुपारी चार वाजताच्या दरम्यान नरखेड तालुक्यातील खलानगोंद्री शिवारात टोळधाड ( नाकतोड्या किड्यांचा हल्ला) झाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी भयभीत झाला आहे.या टोळधाड पासून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण कसे करावे याबाबत प्रशासनही चिंतेत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सोमवारी  दुपारी चार वाजताच्या दरम्यान नरखेड तालुक्यातील खलानगोंद्री शिवारात टोळधाड ( नाकतोड्या किड्यांचा हल्ला) झाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी भयभीत झाला आहे.या टोळधाड पासून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण कसे करावे याबाबत प्रशासनही चिंतेत आहे.मध्यप्रदेशातून टोळधाड सातपुडा पर्वत मार्गे महाराष्ट्रातील संत्रा उत्पादक मोर्शी तालुक्यात दाखल झाला . तेथून तो वर्धा तालुक्यातील आष्टी भागात पोहचला. आज दुपारी चार वाजताच्या दरम्यान खलानगोंदरी शिवारातील देविदास चौरे यांच्या शेतात आला. तेथून पुढे तारासावंगा शिवाराकडे निघाला.टोळधाड मध्ये करोडो ,अरबो च्या संख्येने टोळ(नाकतोडे) असतात एकावेळी पाच ते दहा किलोमीटर परिघातील शेकडो एकर शेतजमिनीतील रात्रीच्या वेळी पिकांना हानी पोहोचवते. टोळ सर्व प्रकारच्या झाडांची पाने खातात. झाडाला केवळ खोड ,काड्याच शिल्लक राहतात. सध्या तालुक्यात भाजीपाला व मुख्यत: संत्रा , मोसंबी, लिंबू या झाडांना टोळधाडचा धोका आहे. परिसरात बातमी लिहिपर्यंत काही नुकसान नाही झाले परंतु रात्रभरात किती नुकसान करणार ही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.नरखेड तालुका कृषी अधिकारी डॉ योगीराज जुमडे यांनी टोळधाड पासून बचाव व नियंत्रणाकरिता काही उपाय सांगितले. आगीचा लोळ - टोळधाडीचा शेतावर प्रादुर्भाव झाल्यास आगीचा धूर करावा. मोठा तीव्रतेचा आवाज- शेतात ढोल ताशा ,भांडी ,ट्रॅक्टर चे सायलेन्सर चा मोठा आवाज करावा. रासायनिक औषध फवारणी- टोळधाड समूहाने पिकावर आक्रमण करते, एक समूहात टोळ ची संख्या करोडो मध्ये असते व ती पांच दहा किलोमीटर अंतरावर पसरते . यावर नियंत्रण मिळविण्याकरिता द्रोण द्वारे औषधी फवारणी करावी. क्लोरोपायरीफाँस ५०% साईपरमेथ्रीन५% ३-४ मी. ली. प्रति एक लिटर पाण्यामध्ये मिश्रण बनवून फवारणी करावी. ट्रॅक्टर द्वारे फवारणी- ट्रॅक्टर च्या मागे पॉवर स्प्रे मशिन लावूनही फवारणी केली जाऊ शकते . फवारणी मुळे ५५% नियंत्रण केले जाऊ शकते.तसेच लँम्डासायलोहेथ्रीन ४०० मी.ली. औषध ६०० लिटर पाण्यात मिसळून सकाळी ७ वाजेपर्यंत फवारणी करावी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती