शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

नागपूर जिल्ह्यात ‘टोळ’चा धुमाकूळ : काटोल, सावनेर, मौदा उपविभाग प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 02:12 IST

जिल्ह्यातील नरखेड व काटोल तालुक्यात सोमवारी तर कळमेश्वर, सावनेर, कामठी व नागपूर (ग्रामीण) तालुक्यात मंगळवारी वाळवंटीय टोळ (डेझर्ट लोकस्ट)चे थवे मोठ्या प्रमाणात आढळून आले.

ठळक मुद्दे नुकसान कमी असल्याचा कृषी विभागाचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील नरखेड व काटोल तालुक्यात सोमवारी तर कळमेश्वर, सावनेर, कामठी व नागपूर (ग्रामीण) तालुक्यात मंगळवारी  वाळवंटीय टोळ (डेझर्ट लोकस्ट)चे थवे मोठ्या प्रमाणात आढळून आले. टोळच्या या धूमाकुळामुळे ग्रामीण भगाात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, नियंत्रणासाठी प्रशासन कामाला लागले आहे. सध्या शेतात खरीप किंवा रबी पिके नसल्याने पिकांच्या नुकसानीची शक्यता कमी असल्याची माहिती अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी दिली. मात्र, संत्रा व मोसंबीच्या बागांसह भाजीपाल्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. त्यावर नियंत्रण मिळविणे जिल्हा प्रशासन व कृषी विभागासाठी आव्हानात्मक असून, केवळ जुजबी उपाययोजना केल्या जात आहे.जिल्ह्यात नरखेड तालुक्यातील ताराउतारा, खलानगोन्द्री व खापा (घुडन) शिवारात सोमवारी सायंकाळी टोळ आढळून आली. ताराउतारा भागातील टोळचे थवे वरूड (जिल्हा अमरावती) तर खापा (घुडन) शिवारातील थवे काटोल मार्गे कळमेश्वर तालुक्याच्या दिशेने निघाले. मंगळवारी  ही टोळ कळमेश्वर तालुक्यातील उपरवाही, कोहळी, सावनेर तालुक्यातील खापरखेडा, दहेगाव (रंगारी), कामठी तालुक्यातील कोराडी, लोणखैरी, नांदा, नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील  घोगली, गुमथळा (गुमथी) तसेच फेटरी, खडगाव शिवारात आढळून आली.काही थव्यांच्या स्थलांतराची दिशा नागपूर शहराकडे तर काहींची कामठी व सावनेर शहराकडे होती, अशी माहिती शेतकºयांनी दिली. ती केळवद (ता. सावनेर) शिवारात तसेच मौदा तालुक्यातील काही रेवराल व पारडी शिवारात आढळून आल्याचे काहींनी सांगितले. या टोळने बहुतांश शिवारातील वांगी, भेंडी, टमाटर व इतर भाजीपाल्याच्या पिकांची तसेच संत्रा, मोसंबी, लिंबू, पपईच्या झाडांची पाने मोठ्या प्रमाणात फस्त केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात ४५ वर्षाच्या कालखंडात टोळ पहिल्यांदाच बघायला मिळाली, अशी माहिती कृषी अधिकाºयांनी दिली. यासंदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या कीटकशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. राहुल वडस्कर यांनी सांगितले की, तांबूस रंगाचा हा वाळवंटीय टोळ नाकतोडा गटातील आहे. तृणधान्य हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे. फळपिकेही त्यांचे खाद्य ठरू शकते. ही टोळ हवेच्या दिशेने प्रवास करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. या टोळच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाकडून कोणत्याही प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.टोळ नियंत्रण ही सामूहिक जबाबदारी असून, उपाययोजना सोपी आहे. टोळच्या मार्गात ज्यांची शेती आहे, त्यांनी निरीक्षण करावे. त्या दिवसापुरते शेतात उभे राहून काही वाजविले किंवा धूर केल्यास टोळ थांबत नाही. रात्री ती पिकांवर किंवा बागेतील झाडांवर बसणार नाही, याची काळजी घ्यावी. याबाबत शेतकऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सध्या शेतात पीक नसल्याने नुकसान नाही. टोळ खरीप हंगामात आली असती तर नुकसानीचे प्रमाण अधिक असते.- मिलिंद शेंडे,अधीक्षक, कृषी अधिकारी, नागपूर.शेतकऱ्यांनी निरीक्षण करणे गरजेचे आहे. रात्री टोळ जिथे बसेल, तिथे टायर जाळून धूर केल्यास ती नियंत्रणात येऊ शकते. निंबोळी अर्क व काही कीटकनाशकांची फवारणी केल्यास टोळ थांबत नाही. सध्या शेतात पीक नसल्याने आवाज किंवा धूर करून टोळला पळवून लावता येऊ शकते.- डॉ. राहुल वडस्कर, सहा. प्राध्यापक,कीटकशास्त्र विभाग, पी.के.व्ही. नागपूर.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी