शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

टोळधाडीवर मिळू शकते नियंत्रण : शेतात रात्री किंवा पहाटे फवारणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 00:47 IST

जिल्ह्यात काही भागातील पिकावर टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. टोळधाडीचा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. टोळ उशिरा रात्री किंवा पहाटे विश्रांतीसाठी मोठ्या संख्येने झाडाझुडपांवर जमा झाले असतात. या कालावधीत शेतकऱ्यांनी फवारणी केल्यास नियंत्रण मिळवता येणे शक्य असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाची शेतकऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात काही भागातील पिकावर टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. टोळधाडीचा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. टोळ उशिरा रात्री किंवा पहाटे विश्रांतीसाठी मोठ्या संख्येने झाडाझुडपांवर जमा झाले असतात. या कालावधीत शेतकऱ्यांनी फवारणी केल्यास नियंत्रण मिळवता येणे शक्य असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले आहे.टोळधाड मार्गातील सर्वप्रकारच्या हिरव्या पानांवर हल्ला करून संपवून टाकते. या कीटकांच्या थव्याची व्याप्ती १० किलोमीटर लांब व २ किलोमीटर रुंद इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे. या किडीचे थवे ताशी १२ ते १६ किलोमीटर इतक्या वेगाने उडतात. ही टोळधाड दिवसभर हवेच्या दिशेने उडत जाते. शेतकऱ्यांनी शेतात धूर करणे, ड्रम वाजवून आवाज करणे, फवारणी करणे अशी पावले उचलावीत, असे कृषी विभागाने सांगितले आहे.काटोलमध्ये ८० लिटर कीटकनाशकाची फवारणीसदर किडीच्या सामूहिक नियंत्रणासाठी ‘ट्रॅक्टर ऑपरेटेड स्प्रेयर’ व अग्निशमन दलाच्या बंबांनी ‘क्लारोपायरीफॉस’ या ८० लिटर कीटकनाशकाची फवारणी काटोल परिसरात करण्यात आली.हे उपाय कराशेताच्या आजूबाजूला मोठे चर खोदणेवाद्य वाजवून मोठ्याने आवाज करणेधोका असलेल्या शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर करणेफवारणी करणेअशी करा फवारणीटोळधाडीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी आधारित कीटकनाशक ‘अझाडिरेक्टिन’ १५०० पीपीएम ३० मिली किंवा ५ टक्के निंबोळी अर्काची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. २० किलो गहू किंवा भाताच्या तुसामध्ये ‘फिप्रोनिल ५ एससी’ ३ मिली मिसळावे व त्याला शेतात ठिकठिकाणी ठेवावे. याकडे टोळ आकर्षित होतात व ते मरतात.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी