शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

नागपूर जिल्ह्यात चालकाच्या सतर्कतेने रेल्वे अपघात टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 9:53 AM

शेतशिवारात आग लावल्याने जळालेले बाभळीचे झाड रेल्वे रुळावर पडले. ही बाब चालकाच्या लक्षात येताच ब्रेक लावत रेल्वे थांबविण्यात आली.

ठळक मुद्देरेल्वे रुळावर झाड पडले इतवारी-नागभीड पॅसेंजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतशिवारात आग लावल्याने जळालेले बाभळीचे झाड रेल्वे रुळावर पडले. दरम्यान या रेल्वे रुळावरून दुपारी १ वाजताच्या सुमारास इतवारी नागपूर रेल्वे स्थानक ते नागभीडकडे जाणारी पॅसेंजर धावत होती. अशातच कारगाव शिवारात झाड रेल्वे रूळावर पडल्याची बाब चालकाच्या लक्षात येताच ब्रेक लावत रेल्वे थांबविण्यात आली. अगदी झाडाच्या काही अंतरावरच रेल्वे थांबली. चालकाने वेळीच सतर्कता दाखविल्याने अपघात टळला. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनाक्रमामुळे सदर रेल्वे सुमारे १५ मिनिटे उशिरा धावली. दिनेश येरणे असे चालकाचे तर एस. डी.चांदेकर असे गार्डचे नाव आहे.पॅसेंजरमध्ये साधारणत: ७०० प्रवासी प्रवास करीत होते, अशी माहिती भिवापूर रेल्वेस्थानकाचे स्टेशन मास्तर प्रशांतकुमार यांनी दिली.दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळ अंतर्गत नागपूर ते नागभीड आणि नागभीड ते नागपूर अशा दिवसभरात एकूण आठ फेऱ्या सदर पॅसेंजरच्या होतात. नागपूर इतवारी रेल्वेस्थानकावरून मंगळवारी सकाळी १०.४० ला ५८८४५ क्रमांकाची पॅसेंजर नागभीडच्या दिशेने निघाली. सदर रेल्वे उमरेड स्थानकावर दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी पोहचली. अशातच कारगाव शिवारात रेल्वे पोहचताच रेल्वे रुळावरच जळालेले काटेरी झाड पडले होते. चालक दिनेश येरणे यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी प्रसंगावधान साधत अगदी अचूक क्षणाला रेल्वे थांबविली. अचानकपणे रेल्वे थांबल्याने प्रवासी भयभीत झाले होते. लागलीच झाड पडल्याची बाब लक्षात येताच काही प्रवाशांनी हे झाड बाजूला करण्यासाठी पुढाकार घेतला. १५ ते २० मिनिटात झाड बाजूला केल्यानंतर सदर रेल्वे भिवापूरच्या दिशेने निघाली.अद्याप पत्र नाहीनागपूर नागभीड रेल्वेचे रुंदीकरण होणार असल्याचे नूकतेच जाहीर करण्यात आले. यानंतर मागील काही महिन्यांपासून सदर रेल्वे मार्ग बंद होणार असल्याच्या बाबी चर्चेत आहे. याबाबत उमरेडचे स्टेशन मास्तर आर. के. सिन्हा यांच्याकडे विचारणा केली असता, रेल्वे मार्ग बंदबाबतचे कोणतेही पत्र आमच्याकडे नसल्याची बाब त्यांनी सांगितली. हजारो प्रवासी सदर रेल्वेने दररोज प्रवास करतात.

टॅग्स :railwayरेल्वे