शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे वाचनसंस्कृतीला मिळतेय बळ : ‘कम्युनिटी रिडिंग’चा ट्रेंड वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 11:08 IST

आजतागायत राज्य लॉकडाऊन आहे. या काळात अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजनांद्वारे विरंगुळा केला. अनेक जण वाचनाकडे वळल्याचे दिसून येते. सध्या ‘कम्युनिटी रिडिंग’चा ट्रेंड याच पार्श्वभूमीवर वाढल्याचे दिसून येत आहे.

प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना प्रकोपाच्या भयाने सारे जग लॉकडाऊन झाले. भारतही बंदिस्तावस्थेत आहे. अशा स्थितीत वेळ कसा घालवावा, हा नवा प्रश्न अनेकांपुढे आहे. बंद खोलीत कुटुंबीयांशी बोलून बोलून काय बोलणार किंवा टीव्हीवरील चित्रपट किती बघणार? आॅनलाईन राहून वेळ जाता जात नाही आणि नव्या क्लृप्त्या मनाला तजेला देत नाहीत. अशा स्थितीत पुस्तकेच धावून आल्याचे निदर्शनास येत आहे.गेल्या २० मार्चपासून आजतागायत राज्य लॉकडाऊन आहे. या काळात अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजनांद्वारे विरंगुळा केला. मात्र, त्यालाही मर्यादा असतात. अनेक जण वाचनाकडे वळल्याचे दिसून येते. सध्या ‘कम्युनिटी रिडिंग’चा ट्रेंड याच पार्श्वभूमीवर वाढल्याचे दिसून येत आहे. वाचकप्रिय नेटिझन्सकडून वेगवेगळ्या पुस्तकांचा पर्याय दिला जात आहे. पीडीएफ प्रकारातील पुस्तके मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे.‘कम्युनिटी रिडिंग’ झाले सोपे: मुळात शाळेत असताना गुरुजी प्रत्येक विद्यार्थ्याला एक पुस्तक देत असत. हे पुस्तक दररोज पद्धतीने महिनाभर सगळेच विद्यार्थी वाचून काढत असत. शिवाय, विद्यार्थ्याने वाचलेल्या पुस्तकाचा सारांश इतर विद्यार्थ्यांना भाष्यस्वरूपात सांगण्याचा प्रकारही होता. यालाच ‘कम्युनिटी रिडिंग’ असे म्हटले जाते. बदलत्या काळात वाचनासोबतच हाही प्रकार ºहास पावला होता. लॉकडाऊनमुळे ‘कम्युनिटी रिडिंग’ला बळ मिळत असल्याचे दिसून येते.वाचनाचे व्हिडीओ अपलोड!: वसुंधरा दिवस व पुस्तक दिवसाच्या अनुषंगाने अनेक नाट्यसमूहांनी कम्युनिटी रिडिंगअंतर्गत पुस्तक किंवा नाटक वाचून झाल्यावर वाचनातील व्यक्तीला भावलेले अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून फेसबुक, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटरवर शेअर केले जात आहेत.इतिहासाच्या पुस्तकांना पसंती: व्यक्तीच्या आवडीनुसार वाचनातील प्रकारांचा समावेश होतो. काहींना भाववाचक, सौंदर्यवाचक तर काहींना ऐतिहासिक, सामाजिक, वैचारिक तर काहींना कल्पनारम्य पुस्तकांची आवड असते. त्या अनुषंगाने इतिहासाची पुस्तके मोठ्या प्रमाणात वाचली जात असल्याचे दिसून येते. सोशल माध्यमांवर अशा पुस्तकांची चर्चाही मोठ्या प्रमाणात रंगली आहे.

 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस