शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
4
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी
5
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
6
Indian shot dead: "मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीचीच गोळी घालून हत्या
7
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  
8
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
9
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
10
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
11
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
12
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
13
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
14
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
15
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
16
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
17
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
18
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
19
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
20
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत

स्थानिक ‘स्वराज्य’साठी शिवसेनेने ताणला बाण

By admin | Updated: September 17, 2015 03:37 IST

जिल्हा परिषद, महापालिका, विधानसभा व मेट्रोरिजन या निवडणुकांमध्ये भाजपकडून मिळालेली वागणूक,...

भाजपचा वचपा काढण्याचा विचार : जि.प.मध्येही स्वबळाची तयारी कमलेश वानखेडे  नागपूरजिल्हा परिषद, महापालिका, विधानसभा व मेट्रोरिजन या निवडणुकांमध्ये भाजपकडून मिळालेली वागणूक, भाजपने वेळेवर साथ सोडल्यामुळे झालेले नुकसान यापासून धडा घेत शिवसेना सावध झाली आहे. आगामी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेने ‘बाण’ ताणला आहे. विशेष म्हणजे ग्रामीणमधील सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ऐनवेळी भाजप- सेनेची युती तुटली होती. भाजपकडे असलेल्या जागेवर शिवसेनेकडे सक्षम उमेदवार नव्हते. त्यामुळे वेळेवर उमेदवार शोधण्यासाठी शिवसेनेला खूप धडपड करावी लागली होती. निकालानंतरही भाजपने राष्ट्रवादीशी घरोबा केला. अध्यक्षपद स्वत:कडे तर उपाध्यपद राष्ट्रवादीला सोपविले. अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीने साथ सोडल्याने भाजपने जि.प.मध्ये सेनेला सोबत घेतले व उपाध्यक्षपद दिले. महापालिकेच्या निवडणुकीतही जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत सुटला नव्हता. शेवटी १८ जागांवर युती व काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती झाल्या होत्या. निवडणुकीत भाजपचे संख्याबळ वाढले. शिवसेनेने सहाच जागा जिंकल्या होत्या. सत्ता स्थापनेच्या वेळी भाजपने राजकीय खेळी खेळत शिवसेनेला बाहेर ठेवत आघाडीची नोंदणी केली आणि शिवसेनेला उपमहापौरपद देण्याची परंपराही मोडित काढली. भाजपने उपमहापौरही स्वत: कडेच ठेवले. अडीच वर्षांनी अपक्षाला उपमहापौरपद दिले पण शिवसेनेला संधी दिली नाही. एकंदरित महापालिका व जिल्हा परिषदेत शिवसेनेला नुकसानच सहन करावे लागले. लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेची युती होती. तेव्हा दोन्ही पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते काहीसे एकत्र आले. भाजपची साथ मिळाली व शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी रामटेकचा गड सर केला. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा शिवसेनेची अशीच गत झाली होती. भाजप- सेनेच्या वादात शिवसेनेचे एकमेव आमदार आशीष जैस्वाल यांना पराभवाला सामोरे जावे लागले व जिल्ह्यात शिवसेनेचे ‘अकाऊंट क्लोज’ झाले. त्यामुळे शिवसेना भाजपपासून आणखीनच दुरावली.विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजप- सेना एकत्र आली. त्यामुळे पुढील काळात भाजप- सेना एकत्र बसून निवडणुकांचे नियोजन करेल, असे अपेक्षित होते. मात्र, तसे घडले नाही.काही महिन्यांपूर्वी नागपूर महानगर नियोजन समिती (मेट्रोरिजन)ची निवडणूक झाली. तसे पाहिले तर राजकीयदृष्ट्या ही निवडणूक तेवढी महत्त्वाची नव्हती. या निवडणुकीतही भाजपशी युती व्हावी, अशी शिवसेनेची इच्छा होती. त्यासाठी शिवसेनेच्या काही नेत्यांनी भाजप नेत्यांशी बोलणीही केली. मात्र, भाजप नेत्यांनी अपेक्षित जागा देण्यास नकार देत ताणून धरले. शेवटी युती झाली नाही. सेना स्वबळावर लढली. या वेळीही गाफील राहिलेल्या सेनेची एकही जागा निवडून आली नाही. ही सर्व खदखद शिवसेना नेते व कार्यकर्त्यांच्या मनात आहे. आता विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक तोंडावर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यात होत असलेली ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. आजवरचे पराभव व दगाफटक्याचा हिशेब चुकता करण्यासाठी या निवडणुकीत भाजपची साथ न देण्यावर शिवसेनेत विचारमंथन सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असल्यामुळे हवेत असलेले भाजप नेते जमिनीवर येतील आणि महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेशी सौहार्दपूर्ण बोलणी करतील, असा कयास शिवसेना नेत्यांनी बांधला आहे.