शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

नागपुरात निर्बंधांपासून थोडा दिलासा, एकट्या दुकानांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 22:37 IST

little relief from the restrictions जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता निर्बंधांमध्ये थोडा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. १ जूनपासून अत्यावश्यक सेवांची दुकाने दररोज सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. इतर दुकानांनाही सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी राहील. परंतु ती दुकाने केवळ एकटी (स्टॅन्ड अलोन) असावीत. असे असले तरी शनिवार-रविवारी मात्र अत्यावश्यक सेवांनाच मंजुरी देत कडक बंदी लागू राहील.

ठळक मुद्देसकाळी अकराऐवजी आता दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार दुकाने होम डिलिव्हरी रात्री ११ वाजेपर्यंत, शनिवारी-रविवारी कडक बंद

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता निर्बंधांमध्ये थोडा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. १ जूनपासून अत्यावश्यक सेवांची दुकाने दररोज सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. इतर दुकानांनाही सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी राहील. परंतु ती दुकाने केवळ एकटी (स्टॅन्ड अलोन) असावीत. असे असले तरी शनिवार-रविवारी मात्र अत्यावश्यक सेवांनाच मंजुरी देत कडक बंदी लागू राहील. पालकमंत्री नितीन राऊत यांच्या या घोषणेनंतर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

विशेष म्हणजे आतापर्यंत केवळ अत्यावश्यक सेवांनाच सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी होती. आता दुपारी २ वाजेपर्यंतची वेळ वाढवून देण्यात आली आहे. होम डिलिव्हरीच्या सेवेला रात्री ११ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्ह्यातील कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री नितीन राऊत यांनी ही घोषणा केली. पालकमंत्री राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पुढील १५ जूनपर्यंत कडक निर्बंध जारी राहतील. नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन करीत प्रशासनाला आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले. बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डी. एस. सेलोकार, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे आदी उपस्थित होते.

महत्त्वाचे निर्णय

१५ जूनपर्यंत कडक निर्बंध लागू राहतील. पुढच्या आठवड्यात पुन्हा आढावा घेणार.

अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील.

एकटी दुकाने (स्टॅन्ड अलोन, नॉन ॲसेन्शियल) दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत.

मॉल बंद राहतील.

शनिवारी-रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांची दुकानेच सुरू राहतील.

कृषी संदर्भातील खते, बियाणे इत्यादी दुकाने सर्व सात दिवस सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू राहतील.

खाद्यपदार्थ, मद्य, ई-कॉमर्स व आवश्यक सेवेतील सर्व बाबींची होम डिलिव्हरी रात्री ११ पर्यंत सुरू राहील.

माल वाहतूक पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.

मार्निंग वॉक, आऊट डोअर स्पोर्ट्स बंद राहील.

सर्व सरकारी कार्यालये २५ टक्के उपस्थितीत सुरू राहतील. सर्व खासगी कार्यालये बंद राहतील.

ब्रेक द चेन अंतर्गत सुरू ठेवलेले निर्बंध कायम राहतील.

दुपारी ३ नंतर रस्त्यावर फिरण्यास बंदी

सबळ कारणाशिवाय दुपारी ३ नंतर रस्त्यावर फिरण्यास बंदी राहील. केवळ आरोग्य आणि अत्यावश्यक सेवांशी संबंधित लोकच बाहेर निघू शकतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पुढच्या आठवड्यात पुन्हा आढावा

पुढील आठवड्यात पुन्हा एकदा आढावा घेण्यात येईल. यात निर्बंध शिथिल किंवा आणखी कडक करण्याबाबतचे निर्णय घेतले जातील. मात्र जनतेने बेसावध राहू नये. प्रशासनाने या काळात आरोग्य यंत्रणा आणखी बळकट करण्याकडे लक्ष वेधावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. आढावा बैठकीत लसीकरण, म्युकरमायकोसिस, ऑक्सिजन प्लांट, जनजागृती अभियान यावरही चर्चा करण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर