शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
4
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
5
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
6
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
7
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
8
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
9
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
10
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
11
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
12
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
13
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
14
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
15
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
16
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
17
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
18
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
19
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
20
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार

नागपुरात ४.६५ लाख रुपयाची दारू लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:16 IST

गिट्टीखदान व लकडगंज पोलीस ठाणे परिसरात दारूची दुकाने फोडून ४.५६ लाख रुपये किमतीच्या दारूवर हात साफ केले. गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गिट्टीखदान व लकडगंज पोलीस ठाणे परिसरात दारूची दुकाने फोडून ४.५६ लाख रुपये किमतीच्या दारूवर हात साफ केले. गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे.गिट्टीखदान चौकातील सीपी बारजवळ देशी दारूचे दुकान आहे. लॉकडाऊनमुळे हे दुकान बंद होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास परिसरातील नागरिकाने दुकानाचे व्यवस्थापक देवेंद्र सिंह यांना चोरी झाल्याची माहिती दिली. देवेंद्र यांनी गिट्टीखदान पोलिसांना याबाबत सूचना दिली. दुकानाचे कुलूप तोडून ४ लाख ६५ हजार रुपये किमतीची दारू चोरण्यात आली आहे. आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआरही सोबत नेला होता. पोलिसांनी परिसरातील इतर सीसीटीव्हीची तपासणी केली असता, या गोष्टीचा खुलासा झाला. त्याच आधारावर प्रज्वल ऊर्फ प्रज्या विशाल शेंडे (१९), लुंबिनीनगर, जरीपटका व तिनेश गिरावकर (१९) आजादनगर, गिट्टीखदान यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. दोघांनाही दारू व अन्य अमली पदार्थांचे व्यसन आहे. लॉकडाऊनमुळे हे दोघेही आर्थिक अडचणीत होते. नशा करण्यासाठी आणि आर्थिक तणाव दूर करण्यासाठी त्यांनी दारूचे दुकान फोडले. तपास अधिकारी पीएसआय साजिद यांनी त्यांना न्यायालयात हजर करून १२ जूनपर्यंत ताब्यात घेतले आहे. अशाच प्रकारची घटना लकडगंज, मारवाडी चौकात उघडकीस आली. सिव्हील लाईन्स निवासी अभिषेक जायसवाल यांचे तेथे देशी दारूचे दुकान आहे. १८ मार्चपासून दुकान बंद आहे. चोरांनी दुकानातून दहा हजार रुपये रोख व ५५ हजार रुपयाची दारू चोरली आणि सोबत सीसीटीव्हीचा डीव्हीआरही घेऊन पसार झाले आहेत.

टॅग्स :theftचोरीnagpurनागपूर