शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

दारूची वाहतूक करणारा ट्रक पुलाखाली कोसळला : आगीत चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 22:56 IST

Accident औरंगाबादवरून नागपूर येथे विदेशी दारूची वाहतूक करीत असलेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखाली कोसळला. पुलानजीक असलेल्या विद्युत खांबाच्या तारेला ट्रकचा स्पर्श झाल्याने लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाला.

ठळक मुद्देविद्युत तारेच्या स्पर्शाने आग लाखोंचा माल भस्मसात, वर्धा वाय पॉइंट उड्डाणपुलावरील घटना

 लोकमत न्यूज नेटवर्क

बुटीबोरी (नागपूर) : औरंगाबादवरून नागपूर येथे विदेशी दारूची वाहतूक करीत असलेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखाली कोसळला. पुलानजीक असलेल्या विद्युत खांबाच्या तारेला ट्रकचा स्पर्श झाल्याने लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत लाखो रुपयांचा मुद्देमाल भस्मसात झाला. बुटीबोरी पोलीस स्टेशनअंतर्गत वर्धा वाय पॉइंटवरील उड्डाणपुलावर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. हेमराज ऊर्फ पिंट्या देवीदास पिंपळे (२५, रा.मासळ, ता.लाखांदूर. जि. भंडारा) असे मृत चालकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक हेमराज हा नागपूर येथील भारतीय रोड कॅरिअर ट्रान्सपोर्टमध्ये दीड वर्षांपासून चालक म्हणून काम करीत होता. बुधवारी (दि.१२) तो नेहमीप्रमाणे औरंगाबादवरून अशोक लेल्यांड ट्रक (क्र. एमएच ४० वाय ८१२६) विदेशी दारू ओसीब्लू १८० एम एल.निपा असलेल्या ३०० पेट्या, तर बी सेवनचे ७५० एमएलच्या बॉटल असलेल्या ७०० पेट्या असा हजार पेट्या माल घेऊन नागपूरकडे निघाला. गुरुवारी मध्यरात्री जवळपास १२.१५ वाजताच्या सुमारास वर्धा वाय पॉइंटवरील उड्डाणपुलानजीक ट्रक पोहोचला असता, रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने, तो चुकीच्या मार्गाने उड्डाणपुलावरून चंद्रपूरच्या दिशेने निघाला. त्याच वेळी त्याचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रक पुलाखाली कोसळला. दरम्यान, पुलानजीक असलेल्या विद्युत खांबाच्या जिवंत तारेला ट्रकचा स्पर्श झाल्याने आग लागली.या घटनेत हेमराजला स्वत:ला वाचविण्यास संधी मिळाली नसल्याने, त्याचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, बुटीबोरीचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक संजय भारती, आशिष मोरखडे, अनिल व्यवहारे, बाबुलाल वडमे, सतेंद्र रंगारी, नारायण भोयर, विनायक सातव, राकेश तालेवार आदींनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. ट्रकमध्ये दारू असल्याने आगीचे रौद्र रूप होते. अग्निशमन दलाच्या दोन वाहनांच्या मदतीने पहाटे ५ वाजेच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळविता आले.चार तासांचे रेस्क्यू ऑपरेशनदारूच्या ट्रकला लागलेली आग विझविण्यात पोलीस आणि अग्निशनम दलाला चार तासांचे रेस्क्यू ऑपरेशन करावे लागले. यात चालकांचे प्राण वाचविण्यात अपयश आल्याचे खंत ठाणेदार कोकाटे यांनी व्यक्त केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. सदर घटनेत दारू आणि ट्रक असा एकूण ८० लाख ६७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जळून भस्मसात झाल्याची नोंद घेण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संजय भारती या घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातfireआग