शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या मदतीने दारू तस्करी : महिलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 21:14 IST

दारूच्या तस्करीसाठी आजपर्यंत तस्करांनी विविध क्लृप्त्या वापरल्या आहेत. यात मिठाईच्या बॉक्समधून दारूची तस्करी, शर्टखाली कप्पे असलेल्या जाकिटात दारूच्या बॉटल ठेवणे, साडीखाली परकरला खिसे करणे, जोड्यांच्या डब्यात दारू नेताना तस्करांना अटक झाली आहे. परंतु पहिल्यांदा आपल्या ८, १० आणि १२ वर्षाच्या मुलांच्या खिशात दारूच्या बॉटल देऊन दारूची तस्करी करणाऱ्या महिलेस रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दुपारी रंगेहात अटक केली आहे.

ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा दलाने घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारूच्या तस्करीसाठी आजपर्यंत तस्करांनी विविध क्लृप्त्या वापरल्या आहेत. यात मिठाईच्या बॉक्समधून दारूची तस्करी, शर्टखाली कप्पे असलेल्या जाकिटात दारूच्या बॉटल ठेवणे, साडीखाली परकरला खिसे करणे, जोड्यांच्या डब्यात दारू नेताना तस्करांना अटक झाली आहे. परंतु पहिल्यांदा आपल्या ८, १० आणि १२ वर्षाच्या मुलांच्या खिशात दारूच्या बॉटल देऊन दारूची तस्करी करणाऱ्या महिलेस रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दुपारी रंगेहात अटक केली आहे.रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्येय यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठीत केलेल्या चमूतील सदस्य सहायक उपनिरीक्षक विकास शर्मा, उषा तिग्गा, दीपक पवार हे बुधवारी दुपारी २.३० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर गस्त घालत होते. त्यांना प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या १२९७० जयपूर-कोईम्बतूर एक्स्प्रेसच्या समोरील दिव्यांग कोचमध्ये एक महिला आपल्या तीन मुलांसह संशयास्पद स्थितीत आढळली. या महिलेची चौकशी केली असता तिने समाधानकारक उत्तर दिले नाही. तिला आरपीएफ ठाण्यात आणून विचारणा केली असता तिने आपले नाव रुकसाना इमरान शेख (३२) रा. महाकाली वॉर्ड, चंद्रपूर सांगितले. या महिलेने दारूची तस्करी करण्यासाठी पायमोजे घालून दारूच्या बॉटल बांधल्या होत्या. याशिवाय मुलांच्या बॅग, कम्पासमध्ये दारूच्या बॉटल लपविल्या. या मुलांजवळ आणि तिच्याजवळ मिळून ४०५० रुपये किमतीच्या दारूच्या ८५ बॉटल आढळल्या. सायंकाळी या महिलेची जमानतीवर सुटका करण्यात आली. दुसऱ्या घटनेत सकाळी ११.२० वाजता विकास शर्मा, उषा तिग्गा, दीपक पवार हे प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर गस्त घालत असताना त्यांना १५०२३ गोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या एस २ कोचमध्ये एक बॅग संशयास्पद स्थितीत आढळली. आजूबाजूच्या प्रवाशांना विचारणा केली असता या बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. संशयाच्या आधारे बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या ४११६ रुपये किमतीच्या १६ बॉटल आढळल्या.तिसऱ्या घटनेत दुपारी २.३० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर १२९७० जयपूर कोईम्बतूर एक्स्प्रेसमध्ये समोरील दिव्यांग कोचमध्ये एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळली. चौकशीत त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्याला आरपीएफ ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने आपले नाव मुकुंद प्रकाश हेडाऊ (३२) रा. अष्टभूजा वॉर्ड क्रमांक १७, चंद्रपूर सांगितले. त्याने आपल्या शर्टाच्या खाली विशेष जाकीट तयार करून त्यातील कप्प्यात दारूच्या बॉटल ठेवल्या होत्या. त्याच्याजवळून दारूच्या २३९२ रुपये किमतीच्या ९२ बॉटल जप्त करण्यात आल्या. रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक विरेंद्र वानखेडे यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांनी १०५५८ रुपये किमतीच्या १९३ बॉटल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरliquor banदारूबंदी