शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मद्य परवाने आॅनलाईनच दिले जावेत  : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:25 IST

उत्पादन शुल्क विभागातर्फे देण्यात येणारे परवाने हे यापुढे आॅनलाईनच देण्यात यावे, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.

ठळक मुद्देद डिस्टिलर्स असो.आॅफ महाराष्ट्रशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उत्पादन शुल्क विभागातर्फे देण्यात येणारे परवाने हे यापुढे आॅनलाईनच देण्यात यावे, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.द डिस्टिलर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्र या संघटनेसोबत झालेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. ही बैठक मुंबईत झाली. या विभागात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी ‘इझी आॅफ डुर्इंग बिझनेस’ या सूत्राचा अवलंब केला जाणार आहे. यापुढे मद्य पॅकबंद बाटलीतच मिळावे, अशी मागणी या संघटनेकडून समोर आली. सार्वजनिक जागेत मद्य प्राशन करणाऱ्यांवर नियंत्रण आणण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. सीएल-३ देशी दारूच्या दुकानात यापूर्वी खुली दारू उपलब्ध होत होती. त्यामुळे खुलेआम दारूचे सेवन केले जाते. खुल्या दारूमुळे सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास रोखण्यासाठ़ी सीएल-३ परवानाधारक दुकानात व पॅकबंद बाटलीत विकण्यात यावी. सीएल-३ व एफएल-२ ही दुकाने सकाळी ८ ते रात्री १० पर्यंतच सुरू राहतील असे निर्देशही यावेळी देण्यात आले.देशी दारूच्या रंगाबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. सध्या देशी दारू पांढऱ्या  रंगात उपलब्ध आहे. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार विदेशी दारूप्रमाणेच देशी दारूलाही रंग असावा. देशी दारूला रंग असला तर अवैध दारूवर नियंत्रण मिळविता येईल, असे मत व्यक्त करण्यात आले.याप्रसंगी असोसिएशनला उत्पादन शुल्क मंत्र्यांनी ग्रामरक्षक दल गठित करणे व त्यास सहकार्य करण्याची सूचना केली. अवैध दारू विक्री रोखण्यासाठी ग्रामरक्षक दल हा प्रभावी उपाय असून अवैध दारू निर्मिती कुठे होते याचा शोध घेऊन या व्यवसायाला आळा घालण्यासाठी सरपंचाच्या मदतीने ग्रामरक्षक दलास सहकार्य करण्याची सूचनाही बावनकुळे यांनी केली.

टॅग्स :nagpurनागपूर