नागपूर : समाज, सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित काम करण्याच्या संकल्पनेला ग्रामदूत सशक्त करत आहेत. ते एकप्रकारे दुवा असल्याचे मत राजेशकुमार मालविय यांनी व्यक्त केले.
आदिवासी जनजातींमध्ये असलेले पारंपरिक ज्ञान पुढच्या पिढीकडे प्रवाहित करणे, ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर कार्यकर्ते तयार करण्याची जबाबदारी ग्रामदूतांची आहे. आदिवासी समाजाची स्वत:ची एक व्यवस्था आहे. त्या अनुषंगाने सांगड घालणे महत्त्वाचे ठरेल, असे मालविय म्हणाले. ग्रामायण प्रतिष्ठानच्या सेवागाथेत ते बोलत होते.