शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
3
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
4
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
5
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
6
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
7
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
8
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
9
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
10
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
11
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
12
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
13
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
14
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
15
'मिर्झापूर'मध्ये का काम केलंस? 'ॲनिमल'वर टीका करणाऱ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा थेट सवाल
16
थरार! गाझामध्ये हमासचा कर्दनकाळ ठरलेल्या यासर अबू शबाबला घरातच संपवले! भांडणं ठरलं मृत्यूचं कारण
17
IndiGo Flight Cancellations: लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
18
जो रुट सुसाट! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पण इंग्लंड बॅटरला खरंच ते शक्य होईल का?
19
१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा
20
एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड क्लास अजनी रेल्वे स्थानकावरची बत्ती गुल, तब्बल तासभर स्थानकावर अंधाराचे साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 21:57 IST

ट्रेन सुटण्याची वेळ अन् प्रवाशांची त्रेधातिरपट

नरेश डोंगरे - नागपूर नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अत्यंत महत्वाचे असलेल्या अजनी रेल्वे स्थानकावर रविवारी सायंकाळी हमसफर एक्सप्रेस सुटण्याची वेळ झाली असतानाच अचानक वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे रेल्वे स्थानक काळोखात बुडाले. तब्बल एक तास वीज पुरवठा खंडित होता त्यामुळे प्रवाशांची मोठी त्रेधातिरपट उडाली.

अजनी रेल्वे स्टेशनला वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशन बनविले जाण्याची रेल्वे बोर्डाकडून घोषणा झाली आहे. त्यासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला असून तसे कामही सुरू आहे. अशा या अजनी स्थानकावर वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. आज रविवारी सायंकाळीही तसेच झाले. अजनी-पुणे हमसफर एक्सप्रेस अजनी स्थानकावर येऊन उभी झाली. ती सुटण्याच्या तयारीत असल्याने प्रवाशांची चढण्या-उतरण्याची गडबड घाई सुरू होती. अनेक जण धावपळ करीत होते. अशात सायंकाळी ६.३० च्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे स्थानकावर अंधार निर्माण झाला. अंधारामुळे घबराट उडालेल्या प्रवाशांनी धावत पळत ट्रेन गाठण्याचा प्रयत्न केला. काहीजण लगेजसह धावताना पडल्याचे सांगितले जात होते. तब्बल तासभर वीज पुरवठा खंडित होता अन् प्रवासी मोबाईलच्या टॉर्चमध्ये स्वत:भोवती कसा बसा प्रकाश करून आपल्या सामानाची सुरक्षितता करीत होते.

विशेष म्हणजे, अजनी स्थानकावरचा वीज पुरवठा खंडित होण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वीही अनेकदा अशी घटना घडली आहे. प्रत्येक वेळी रेल्वे प्रशासनाकडून महावितरणकडे बोट दाखविले जाते. मात्र, रेल्वे प्रशासन तसेच महावितरण कडून या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नसल्याचे प्रवासी म्हणतात.अपघाताचा धोकावर्ल्ड क्लासची घोषणा झालेल्या अजनी स्थानकावर गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळे काम सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी अडथळेदेखिल आहे. अशा वेळेस वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अंधार पसरल्यास प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन तसेच महावितरणने या समस्येकडे गंभीरपणे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.अनेकांना झाला मनस्तापसायंकाळी ६.३० पासून खंडित झालेला वीज पुरवठा तब्बल तासभरानंतर पूर्ववत झाला. या तासाभराच्या कालावधीत स्थानकावर येणाऱ्या, या फलाटावरून त्या फलाटावर जाण्यासाठी जिना चढउतर करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि आजारी प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या संबंधाने अजनी स्टेशन मॅनेजर माधुरी चौधरी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी वीजपुरवठा खंडित होण्यासाठी महावितरण जबाबदार असल्याचे म्हटले.