जीवघेणी कसरत : महारुद्रनगर - श्यामनगर दरम्यान असणाऱ्या नाल्यावरील जुना पूल पावसाळ्यात पुरात वाहून गेला. त्यामुळे नव्या पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र तो अर्धवटस्थितीत असून ते काम सध्या बंद आहे. परिणामी नागरिकांना या मार्गाने ये-जा करता यावी यासाठी म्हणून पुलावर चढण्यासाठी लाकडी शिडी लावण्यात आली. तेथूनच नागरिक जीवघेणी कसरत करीत ये-जा करतात. बालक, महिलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही श्यामनगरात जाण्यासाठी जीव धोक्यात टाकून शिडीद्वारे पुलावर चढावे लागते.
जीवघेणी कसरत :
By admin | Updated: May 8, 2016 02:55 IST