शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

‘आयुष्यमान भारत’चे पॅकेज कमी; २५ ते ३० टक्क्यांची तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 11:33 IST

: केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत’मध्ये महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील पॅकेजच्या तुलनेत साधारण २५ ते ३० टक्क्यांची तफावत आहे.

ठळक मुद्दे खासगी इस्पितळांमध्ये उदासीनता

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत’मध्ये लाभार्थी रुग्णाला योजनेत समाविष्ट देशभरातील कुठल्याही रुग्णालयात उपचार घेता येतात. परंतु या योजनेत महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील पॅकेजच्या तुलनेत साधारण २५ ते ३० टक्क्यांची तफावत आहे. परिणामी, नागपुरात खासगी इस्पितळांमध्ये आयुष्यमान भारत योजना सुरू होऊनही उदासीनतेचे सावट आहे. ‘पॅकेज’मध्ये हा भेदभाव का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.‘आयुष्यमान भारत’ची सुरुवात नागपूर जिल्ह्यात २३ सप्टेंबरपासून झाली. या योजनेत नागपूर शहरातील २ लाख ३९८ तर ग्रामीणमधील १ लाख ७६ हजार ९०३ असे मिळून ३ लाख ७७ हजार ३०१ पात्र कुटुंबीयांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मेयो, मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व डागा रुग्णालयातून ही योजना सुरू झाली, तर आता दुसºया टप्प्यात खासगी इस्पितळांचा समावेश करण्यात आला आहे.परंतु ज्या इस्पितळांमध्ये जन आरोग्य योजना राबविली जाते, त्याच इस्पितळांना आयुष्यमान भारत योजना राबविण्याचे आदेश आहेत. त्यामुळे नागपुरातील २६ इस्पितळांना याबाबत सामंजस्य करार करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मात्र यातील तीन इस्पितळांनी ‘पॅकेज’ कमी असल्याच्या कारणावरून अद्यापही करार केला नाही; तर ज्या इस्पितळांनी करार केला आहे तिथे या योजनेतून फार कमी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती आहे.

‘नी’ व ‘हिप रिप्लेसमेंट’ केवळ शासकीय रुग्णालयातचआयुष्यमान भारत योजनेतून ‘नी’ व ‘हिप रिप्लेसमेंट’ची शस्त्रक्रिया केवळ शासकीय रुग्णलयांमध्येच करण्याचे निर्देश आहेत. खासगी इस्पितळांना या शस्त्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले आहे, खासगी इस्पितळांच्या उदासिनतेला हेही एक कारण असल्याचे, बोलले जात आहे.

२६ खासगी हॉस्पिटलचा समावेशआयष्युमान भारत योजनेचा करार मेयो, मेडिकल, डागा व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या शासकीयसह आशा हॉस्पिटल, गिल्लूरकर हॉस्पिटल, लता मंगेशकर हॉस्पिटल, महात्मे आय हॉस्पिटल, मोगरे हॉस्पिटल, एचसीजी एनसीआयएचआरआय, सूरज आय हॉस्पिटल, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जामठा, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट वेस्ट हायकोर्ट रोड, स्वामी विवेकानंद हॉस्पिटल, कुणाल हॉस्पिटल, शुअरटेक हॉस्पिटल, न्यू ईरा हॉस्पिटल, अर्चनेगेल हॉस्पिटल, मेडिकल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व सारक्षी नेत्र हॉस्पिटल आदींनी केला आहे. तर अश्विनी डायलिसीस सेंटर, डॉ. के.जी. देशपांडे मेमोरिअल सेंटर व गेटवेल हॉस्पिटल अद्यापही करारापासून दूर आहेत.

बालरोग शल्यक्रियेत १५ हजारांचा फरकमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत ९७१ तर आयुष्यमान भारत योजनेत १३४९ उपचारांचा समावेश आहे. या दोन्ही योजनेतील ५८१ उपचार पद्धती सारख्या आहेत. आयुष्यमान भारत योजनेचे पॅकेज जन आरोग्य योजनेच्या तुलनेत २५ ते ३० टक्क्यांनी कमी आहे. विशेषत: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी बालरोग शल्यक्रियेचे पॅकेज ३० हजारांचे आहे, तर मध्य प्रदेशातील रुग्णांसाठी हेच पॅकेज आयुष्यमान भारत योजनेत १५ हजारांचे आहे.

मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातील रुग्णांत वाढमध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातून नागपुरात उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या पूर्वीपासूनच फार मोठी आहे. यातच आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्याला योजनेत समाविष्ट देशभरातील कुठल्याही रुग्णालयात उपचार घेण्याची मुभा आहे. यामुळे रुग्णांचा ओघ नागपूरकडे आणखीनच वाढला आहे. परंतु जनआरोग्य व आयुष्यमान भारत योजनेच्या पॅकेजमध्ये तफावत असल्याने रुग्णांना खर्चाचा ताळमेळ बसविणे खासगी रुग्णालयांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

टॅग्स :Healthआरोग्य