शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

अपंग मुलीवर बलात्कार करणाऱ्या  नराधमास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 20:47 IST

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १२ वर्षीय अपंग मुलीवर बलात्कार करणाऱ्या  एका ५५ वर्षीय नराधमाला पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. के. कुळकर्णी यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि १० हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देपोक्सो विशेष न्यायालयाचा निकालनागपूर जिल्ह्यातील पारशिवनी भागात घडला होता थरार

आॅनलाईन लोकमतनागपूर : नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १२ वर्षीय अपंग मुलीवर बलात्कार करणाऱ्या  एका ५५ वर्षीय नराधमाला पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. के. कुळकर्णी यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि १० हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून १० हजार रुपये पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.महादेव दमडूजी घोंगरे, असे आरोपीचे नाव असून तो पारशिवनी भागातीलच पेंढरी येथील रहिवासी आहे.पीडित मुलगी ही एका पायाने अपंग होती. तिचे दुर्दैव असे की, सात वर्षांपूर्वी तिचे वडील मरण पावले होते. तिच्या आईने दुसरा घरोबा केला होता. त्यामुळे ती आपल्या आत्याकडे राहत होती.घटनेच्या दिवशी २९ जून २०१३ रोजी आत्या आपल्या मुलीच्या सासरी गेली होती. त्यामुळे पीडित मुलगी आणि आत्याचा पती, असे दोघेच घरी होते. रात्री ९ वाजताच्या सुमारास संधीचा फायदा घेत पितातुल्य आरोपी महादेवने पीडित मुलीचे तोंड रुमालाने बांधून, ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर बरेच दिवस तो पीडित मुलीसोबत कुकर्म करीत राहिला. पीडित मुलीने आपल्या आजीचे गाव गाठून कर्म काहाणी कथित केली होती. पीडित मुलीच्या चुलत भावाने पारशिवनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताच पोलिसांनी भादंविच्या ३७६(२) (एफ) (आय), ५०६ आणि लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण कायद्याच्या ४,६,८,१० कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपीला १ जुलै २०१३ रोजी अटक करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. गोस्वामी यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपी महादेवला भादंविच्या कलम ३७६(२)(एफ)(आय) आणि पोक्सोच्या कलम ५ अन्वये जन्मठेप, १० हजार रुपये दंड आणि कलम ५०६ अंतर्गत ६ महिने कारावास, ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील वर्षा आगलावे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. मालोदे यांनी काम पाहिले. जिल्हा समन्वय अधिकारी उपनिरीक्षक डी. एन. मात्रे, सहायक फौजदार रमेश भुसारी, अरुण भुरे, हेड कॉन्स्टेबल भवानीप्रसाद मिश्रा, बाबूलाल राठोड, मुकुंद जयस्वाल यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.

 

 

टॅग्स :Courtन्यायालय