शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेस जाळून पाहत बसणाऱ्या पती, सासऱ्याची जन्मठेप कायम; चारित्र्याच्या संशयावर केला होता घात

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: March 7, 2026 17:15 IST

Nagpur : चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेला लग्नानंतर तीन वर्षातच जाळणाऱ्या व तिच्याकडे गप्पपणे पाहत बसलेल्या पती व सासऱ्याला कर्माची फळे भोगावी लागणार आहेत.

राकेश घानोडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेला लग्नानंतर तीन वर्षातच जाळणाऱ्या व तिच्याकडे गप्पपणे पाहत बसलेल्या पती व सासऱ्याला कर्माची फळे भोगावी लागणार आहेत. मुंबईउच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने घटनेची क्रूरता व पुरावे विचारात घेता दोघांचीही जन्मठेपेसह इतर शिक्षा कायम ठेवली आहे. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील आहे.

अमोल देशमुख (वय २८) व विजय देशमुख (वय ५३) अशी आरोपींची नावे असून, ते पोफळी, ता. उमरखेड येथील रहिवासी आहेत. विवाहितेचे नाव छाया होते. तिचे २००९ मध्ये अमोलसोबत लग्न झाले होते. दरम्यान, दोन वर्षापर्यंत आरोपींनी छायाला चांगले वागवले. त्यानंतर छायाच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी तिचा छळ करायला लागले.

आरोपींनी १५ सप्टेंबर २०१२ रोजी रात्री ११ च्या सुमारास छायाची हत्या करण्यासाठी आधी तिला बेदम मारहाण केली. तिचा गळा दाबला आणि त्यानंतर रॉकेल टाकून आग लावली आणि तिला जळताना पाहत बसले. छायाने स्वतःला वाचविण्यासाठी प्रतिकार केला होता. त्यामुळे आरोपींचे कपडेही रॉकेलने ओले झाले होते.

हत्येच्या गुन्ह्याकरिता दोषी

सत्र न्यायालयाने २ मार्च २०२१ रोजी दोन्ही आरोपींना हत्येच्या गुन्ह्याकरिता दोषी ठरवून जन्मठेप व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.त्यावर न्यायमूर्तीद्वय अनिल पानसरे व राज वाकोडे यांच्यापुढे सुनावणी झाली. उच्च न्यायालयानेही आरोपी दोषी असल्याचा निर्णय देऊन अपील फेटाळून लावले.

English
हिंदी सारांश
Web Title : Husband, Father-in-law's Life Sentence Upheld in Bride Burning Case

Web Summary : Yavatmal man and father convicted for burning wife alive over infidelity suspicions. Nagpur High Court upheld life sentences, citing the crime's cruelty and solid evidence presented during the trial. The crime occurred in 2012.
टॅग्स :High Courtउच्च न्यायालयDomestic Violenceघरगुती हिंसाnagpurनागपूरMumbaiमुंबई