शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

‘एमआरओ’ला जूनमध्ये परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2015 02:11 IST

बोर्इंग एमआरओच्या टॅक्सी-वेचे पहिले यशस्वी प्रात्यक्षिक २२ एप्रिलला घेतल्यानंतर प्रत्यक्ष कामाचा परवाना जूनच्या अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता

नागपूर : बोर्इंग एमआरओच्या टॅक्सी-वेचे पहिले यशस्वी प्रात्यक्षिक २२ एप्रिलला घेतल्यानंतर प्रत्यक्ष कामाचा परवाना जूनच्या अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडचे (एआयईएसएल) उपमहाव्यवस्थापक सुनील अरोरा यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. प्रात्यक्षिक अहवाल नागरी विमान उड्ड्यण महासंचालनालयाकडे त्यावेळीच पाठविण्यात आला होता. त्यावर प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बोर्इंगचे ७७७-३०० ईआर हे विमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर उतरले होते. टॅक्सी-वे वरून एमआरओमध्ये यशस्वीपणे नेण्यात आले आहे. एमआरओची जबाबदारी एअर इंडियाची उपकंपनी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेसकडे सोपविण्यात आली आहे. मिहान-सेझमध्ये ५० एकर जागेवर जवळपास एमआरओ उभारला आहे. संपूर्ण प्रकल्प व जमीन एअर इंडियाची आहे. मात्र, तांत्रिक उभारणी बोर्इंगने केली आहे. मध्यम आकाराच्या (बोर्इंग ७३७) तीन विमानांची एकावेळी दुरुस्ती करण्याची रचना या एमआरओमध्ये आहे. सुमारे ५५० कोटी रुपये गुंतवणुकीची योजना एअर इंडिया आणि बोर्इंगची आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टॅक्सी वेची लांबी २.६५ कि़मी. असून रुंदी ४० मीटर आहे. ६० टनाच्या विमानांचा भार सोसण्यासाठी जाडी १५ फूट आहे. सुमारे तीन ते चार पदरी क्राँक्रीटचा हा मार्ग आहे. दोन्ही बाजूला प्रत्येकी २३.५ मीटर जागा सोडली आहे. बांधकाम पीबीए इन्फ्रास्ट्रक्चरने केले आहे. बोर्इंगसाठीचा टॅक्सी-वे शिवणगावाला जाणाऱ्या रस्त्यात आहे. यामुळे शिवणगावसाठी विशेष गेट उभारले आहे. विमानांची ये-जा सुरू असताना हे गेट बंद ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)