पुण्यतिथी सोहळा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाहीनागपूर : सदुंबरे येथील श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या समाधी स्थळाला धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने व नागपूर येथील संताजी स्मारकाचे कामाला गती देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. श्री संत संताजी जगनाडे महाराज स्मारक समितीतर्फे जगनाडे चौक येथे आयोजित पुण्यतिथी स्मरणोत्सव सोहळ्यात ते बोलत होते.प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आ. जोगेंद्र कवाडे, समाजसेवक डॉ. विलास डांगरे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, संस्थेचे अध्यक्ष बन्शीलाल चौधरी आदींनी महाराजांच्या प्रतिमेची विधिवत पूजा केली. क्षीरसागर, कवाडे व डांगरे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, माजी मंत्री मधुकर किंमतकर, माजी आमदार बळवंतराव ढोबळे, नासुप्रचे विश्वस्त डॉ.रवींद्र भोयर, शेखर सावरबांधे आदी उपस्थित होते. चौधरी यांनी प्रास्तविक केले. डॉ. यशवंत खोब्रागडे यांनी संचालन तर आभार अनिल ढोबळे यांनी मानले.कार्यक्रमासाठी कैलास गायधने, डॉ. राम कोल्हे, विनायक भांगे, प्रा. गणेश मस्के, नंदकिशोर सहारे, डॉ. जगदीश देशुमख , गुंजन खोब्रागडे, माधुरी वाघमारे व डॉ. प्रज्ञा खंडाईत आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
संताजी स्मारकाच्या कामाला गती देणार
By admin | Updated: December 21, 2014 00:13 IST