शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

चला दोस्ती निभवूया, एकेक मित्र वाचवूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 20:16 IST

भेटा, नको भेटा. काही फरक पडत नाही. भेट झाली तर एकमेकांवर तुटून पडायचे अन् नाही झाली तर रुसून बसायचे. दिल, दोस्ती, दुनियादारी मैत्रीची बातच न्यारी... सर्वात पवित्र प्रेम माय-लेक/लेकीचे असते, सर्वात मोठे कर्तव्य पिता-पुत्रात असते अन् ज्ञानार्जनातील सर्वात मोठे रहस्य गुरु-शिष्यात असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जिथे काहीच नसते तिथे मैत्री असते... तर चला दोस्ती निभवूया अन् आपल्या मित्रांना संसर्गापासून वाचवूया.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भेटा, नको भेटा. काही फरक पडत नाही. भेट झाली तर एकमेकांवर तुटून पडायचे अन् नाही झाली तर रुसून बसायचे. दिल, दोस्ती, दुनियादारी मैत्रीची बातच न्यारी... सर्वात पवित्र प्रेम माय-लेक/लेकीचे असते, सर्वात मोठे कर्तव्य पिता-पुत्रात असते अन् ज्ञानार्जनातील सर्वात मोठे रहस्य गुरु-शिष्यात असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जिथे काहीच नसते तिथे मैत्री असते... तर चला दोस्ती निभवूया अन् आपल्या मित्रांना संसर्गापासून वाचवूया.ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन पाळला जातो. तसे बघितल्यास मैत्रीसाठी एका दिवसाचे विशेष असे काही नाही, केवळ औपचारिकता तेवढी. तर मैत्री दिनाचे पर्व २ ऑगस्ट रोजी येतेय. अर्थातच सगळ्या मित्रांनी काही विशेष असे प्रयोजन केलेच असेल. सेलिब्रेशन हा मित्रांमधील सर्वात मोठा संसर्ग आहे आणि या संसर्गाने साऱ्या जगाला प्राचीन काळापासूनच ग्रासले आणि चैतन्य, आनंद, निरागसतेचे वारे वाहायला लागले. सध्या मात्र अवघे जग कोरोना नावाच्या सूक्ष्म दैत्याच्या चक्रात अडकले आहे. याचा संसर्ग जीव घेणारा आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे जिथे काहीच नसते तिथे मैत्री असते आणि जिथे मैत्री असते तिथे नि:स्वार्थता असते. म्हणूनच तर आनंदात एकवेळ सहभागी होणार नाही. मात्र, संकट कोसळले की सर्वात आधी हजर असतात ते मित्र. या संकटाच्या काळातही मैत्री सर्वश्रेष्ठ ठरते आहे आणि तेच कर्तव्य यंदा जपायचे आहे. प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणे, हाताला मैत्रीबंध बांधणे, भेटवस्तू देणे किंवा धम्माल करणे... हे यंदा टाळूयात. कारण, हे केल्याने संसर्गाचा धोका वाढणार आहे आणि कोणतेच मित्र-मैत्रीण आपल्या मित्रांना धोक्यात घालू इच्छिणार नाही. आज प्रत्येकाजवळ एक नव्हे दोन-तीन मोबाईल फोन्स आहेत. प्रत्येकच मोबाईलमध्ये इंटरनेट आहे आणि व्हिडिओ कॉलिंग किंवा वेगवेगळ्या मिटिंग अ‍ॅप्सची सुविधाही आहे. या माध्यमांचा वापर करून एकमेकांना बंध पाठवणे, गप्पा मारणे आणि घरूनच ऑनलाईन सेलिब्रेशन करणे शक्य आहे. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ याचप्रमाणे एकेका मित्र/मैत्रिणींनी समाज, राष्ट्राचा ढाचा तयार होतो. ज्याप्रमाणे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचे कार्य करावे लागत आहे, त्याचप्रमाणे राष्ट्राला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रत्येक मित्र/मैत्रीण सुदृढ असणे गरजेचे आहे. म्हणून, मैत्री दिनाला गोंधळ, गोंगाट अन् गर्दी टाळूया व देशाला वाचवूया. शेवटी देशासोबतही आपले असेच एक नि:स्वार्थ असे मैत्रीचे नाते आहेच की.

टॅग्स :Friendship Dayफ्रेंडशिप डेnagpurनागपूर