शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लेटलतिफीला विभागप्रमुख जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 01:52 IST

महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची मनमानी व लेटलतिफीची आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी गंभीर दखल घेतली आहे. कर्मचारी कार्यालयात उशिरा आल्यास यासाठी विभागप्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल. यासाठी विभागप्रमुखांना आपल्या विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांनी वर्तनात सुधारणा न केल्यास विभागप्रमुखांनी याची माहिती द्यावी. अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्याचा इशारा आयुक्तांनी बुधवारी विभागप्रमुखांच्या बैठकीत दिला.

ठळक मुद्देमनपा आयुक्तांची तंबी : हलचल रजिस्टर ठेवण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची मनमानी व लेटलतिफीची आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी गंभीर दखल घेतली आहे. कर्मचारी कार्यालयात उशिरा आल्यास यासाठी विभागप्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल. यासाठी विभागप्रमुखांना आपल्या विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांनी वर्तनात सुधारणा न केल्यास विभागप्रमुखांनी याची माहिती द्यावी. अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्याचा इशारा आयुक्तांनी बुधवारी विभागप्रमुखांच्या बैठकीत दिला.उपस्थित अधिकाऱ्यांना कर्र्मचारी उशिरा येत असल्याबाबत धारेवर धरले. बायोमेट्रिक मशीन लावल्यानंतरही अनेक कर्मचारी पंचिंग केल्यानंतर दुपारी कार्यालयात उपस्थित नसतात. त्यानंतर सायंकाळी पंचिंग करून घरी जातात. कर्मचारी उपस्थित राहत नसल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कार्यालयात येण्याची वेळ सकाळी १० वाजताची असताना, अनेक कर्मचारी १०.१५ ते १०.३० पर्यंत कार्यालयात येतात. सायंकाळी ५.४५ ला पंचिंग करून घरी जातात. कार्यालयीन वेळेत कर्मचारी कार्यालयात उपस्थित असणे आवश्यक आहे.जे कर्मचारी वा अधिकारी कार्यालयीन कामानिमित्ताने बाहेर फिल्डवर आहेत, त्यांनी हलचल रजिस्टरमध्ये नोंद करणे आवश्यक आहे. यासाठी रजिस्टर ठेवून त्यांनी नोंदी ठेवा; अन्यथा संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.नाव, पद व जबाबदारीच्या पाट्या लागल्याकार्यालयातील कर्मचाऱ्यांचे नाव, पद व जबाबदारी याची माहिती असलेल्या पाट्या कर्मचाऱ्यांच्या टेबलवर लावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली.फाईल तातडीने निकाली काढाकर्मचारी व अधिकाऱ्यांच्या टेबलवर फाईल प्रलंबित नसावी. फाईल मंजुरीसाठी आल्यानंतर ती ठरलेल्या कालावधीत निकाली काढली पाहिजे. कुणाच्याही टेबलवर फाईल पडून राहिल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल,असा इशाराही आयुक्तांनी दिला.भटकंतीला लागणार चापमहापालिका मुख्यालयात कर्मचारी व अधिकारी टेबलवर मिळत नाही.त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्यांना चकरा माराव्या लागतात.शहराच्या लांब भागातील येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना यामुळे हकनाक त्रास होतो. आयुक्तांच्या निर्देशामुळे कर्मचाऱ्यांच्या भटकंतीला चाप लागणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर