शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी चित्रकलेतून दिले वाहतूक नियमांचे धडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 01:28 IST

दरवर्षी रस्ते अपघातात हजारोंचे बळी जात असतात. वाहनचालकांनी वाहतुकींचे नियम योग्य पद्धतीने पाळल्यास हे अपघात निम्म्याने कमी होऊ शकतील. खरेतर वाहतुकीचे नियम पाळणे ही जीवनशैली झाली पाहिजे. हा संदेश घेऊन शेकडो शाळकरी विद्यार्थी बुधवारी रंगांच्या दुनियेत रंगले होते. हा उपक्रम नागपूर शहर पोलिसांच्यावतीने राबविण्यात आला.

ठळक मुद्देनागपूर शहर पोलीस विभागाचा उपक्रम : सेंट पॉल शाळेत आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दरवर्षी रस्ते अपघातात हजारोंचे बळी जात असतात. वाहनचालकांनी वाहतुकींचे नियम योग्य पद्धतीने पाळल्यास हे अपघात निम्म्याने कमी होऊ शकतील. खरेतर वाहतुकीचे नियम पाळणे ही जीवनशैली झाली पाहिजे. हा संदेश घेऊन शेकडो शाळकरी विद्यार्थी बुधवारी रंगांच्या दुनियेत रंगले होते. हा उपक्रम नागपूर शहर पोलिसांच्यावतीने राबविण्यात आला. 

शहर पोलीस व वाहतूक शाखेच्या रस्ते सुरक्षा दलातर्फे सेंट पॉल शाळेच्या परिसरात रस्ता सुरक्षा विषयावर आंतरशालेय चित्रकला व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेच्या उद््घाटनप्रसंगी शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, उपायुक्त (वाहतूक शाखा) तिळक रोशन, सेंट पॉल शाळेचे संचालक डॉ. राजाभाऊ टांकसाळे, प्राचार्या देवांगणा पुंडे, मुख्याध्यापिका संगीता पिरके, हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यवान माने, वाहतूक शाखेचे पीआय वाजीद शेख, कॉन्स्टेबल देठे, गोविंद चाटे, नीलेश बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. उपाध्याय यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियम पाळण्याबाबत प्रेरक मार्गदर्शन केले.या स्पर्धेत शहरातील विविध शाळांचे ८०० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी आरएसपी परेड व सलामी दिली. त्यानंतर चित्रकलेला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी वाहतूक नियम पाळण्याचा आग्रह धरणारे व नियम न पाळल्यामुळे कसे धोके उद्भवतात यावर अतिशय मनमोहक चित्र काढून सर्वांचे लक्ष वेधले. सोबत आकर्षक घोषवाक्यही मुलांनी तयार केले. सध्या शहरातील अनेक चौकामध्ये वाहतूक नियम पाळण्याबाबत आवाहन करणारे ‘गब्बर सिंग’चे पोस्टर्स सर्वांचे लक्ष वेधत आहेत. विद्यार्थ्यांनी काढलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रांनाही चौकात असेच स्थान देण्यात येणार असल्याचे पोलीस विभागातर्फे सांगण्यात येत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरएसपी हेड कॉन्स्टेबल अतुल आगरकर व संचालन शाळेच्या शिक्षिका संगीता मानकर यांनी केले. डॉ. राजाभाऊ टांकसाळे यांनी आभार मानले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीStudentविद्यार्थी