शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

छळ करणाऱ्या  मुलाला आईने शिकविला धडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 13:42 IST

जन्मदात्या आईची सेवा करणे प्रत्येक मुलाचे कर्तव्य असते. परंतु, एखादा मुलगा हे कर्तव्य विसरून आईचा अमानुषरीत्या छळ करीत असेल तर, त्याला धडा शिकविणे आवश्यक होऊन जाते. एका लढवय्या आईने तसेच केले. तिने कायद्याच्या मार्गाने हक्काची लढाई लढून मुलाला घर खाली करण्यास लावणारा आदेश मिळविला.

ठळक मुद्देहक्काच्या लढ्यात विजयीमुलाला घर खाली करण्याचा आदेश

आॅनलाईन लोकमतनागपूर : जन्मदात्या आईची सेवा करणे प्रत्येक मुलाचे कर्तव्य असते. परंतु, एखादा मुलगा हे कर्तव्य विसरून आईचा अमानुषरीत्या छळ करीत असेल तर, त्याला धडा शिकविणे आवश्यक होऊन जाते. एका लढवय्या आईने तसेच केले. तिने कायद्याच्या मार्गाने हक्काची लढाई लढून मुलाला घर खाली करण्यास लावणारा आदेश मिळविला. संबंधित घर आईने स्वत:च्या मिळकतीतून बांधले असून त्यावर मुलाने त्याच्या कुटुंबासह बळजबरीने कब्जा केला होता.कांताबाई साखरे (६१) असे आईचे नाव असून त्या सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी आहेत. नवीन जरीपटक्यातील कीर्तिधर सोसायटीत त्यांचे घर आहे. कांताबाई यांनी घराचा पूर्ण ताबा मिळण्यासाठी ‘आई, वडील व ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम-२००७’मधील कलम ५ अंतर्गत निर्वाह न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. न्यायाधिकरणने त्यांचा अर्ज मंजूर करून मुलगा महेश व त्याच्या कुटुंबीयांना एक महिन्यात घर खाली करण्याचा आदेश दिला आहे. महेश व त्याच्या कुटुंबीयांनी कांताबाई यांच्या इच्छेविरुद्ध घरात प्रवेश केला आहे. त्यांचे वर्तन व वागणूक कांताबाई यांना त्रासदायक ठरत आहे. कांताबाई यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येत आहे असे निरीक्षण न्यायाधिकरणने हा निर्णय देताना नोंदविले आहे.कांताबाई यांना महेशसह तीन मुले व एक मुलगी आहे. ते सर्वजण आपापल्या कुटुंबासह वेगवेगळे रहात होते. दरम्यान, २०१६ मध्ये महेश व त्याच्या कुटुंबीयांनी बळजबरीने कांताबाई यांच्या घरात प्रवेश केला. तसेच, हॉल, किचन व बेडरुमचा ताबा घेतला. त्यानंतर त्यांनी समाधानाने राहायचे सोडून कांताबाईला त्रास देणे सुरू केले. ते कांताबाईला मारहाण करून घरातून हाकलून देण्याची धमकी देत होते. परिणामी, कांताबाई यांनी जरीपटका पोलीस ठाण्यामध्ये पाचवेळा तक्रारी नोंदविल्या. परंतु, तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायाधिकरणात धाव घेतली होती. महेश व त्याच्या कुटुंबीयांनी स्वत:ची बाजू स्पष्ट करताना कांताबाईचे आरोप फेटाळून लावले होते. परंतु, उपलब्ध पुराव्यांवरून न्यायाधिकरणने कांताबाईला दिलासा दिला.

 

टॅग्स :Courtन्यायालय