शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

..म्हणून दक्षिण-पश्चिमच्या माजी नगरसेवकांना ५० टक्के पेक्षा कमी गुण; गडकरींनी सुनावले खडेबोल

By गणेश हुड | Updated: September 24, 2022 18:30 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिव्यांगाना साहित्य वाटप

नागपूर : दक्षिण नागपुरातील नगरसेवकांना त्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे ९० टक्के गुण देता येतील. मात्र दक्षिण -पश्चिम मतदारसंघातील कामे पाहता माजी नगरसेवकांना १०० पैकी ५० टक्केपेक्षा कमी गुण द्यावे लागतील, असे खडेबोल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुनावले. दक्षिण पश्चिम मतदारसंघात शनिवारी कृषी विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

साहित्य वाटप कार्यक्रमाला किमान १० हजार गरजू उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. मात्र माजी नगरसेवक कमी पडले. अशी नाराजी गडकरी यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे वितरण शिबिरामध्ये गडकरी व फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात १० लाभार्थ्यांना उपकरणे प्रदान करण्यात आली. दक्षिण पश्चिम आणि पश्चिम नागपुरातील ३९५० लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. प्रास्ताविकात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपाद्वारे वितरित केलेल्या साहित्याची माहिती दिली.

आमदार प्रवीण दटके, मोहन मते, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, डॉ. परिणय फुके, खादी आयोगाचे संचालक जयप्रकाश गुप्ता, आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर, नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना, राम जोशी, माजी आमदार प्रा. अनिल सोले, सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, नाना शामकुळे, कार्यक्रमाचे संयोजक नरेंद्र बोरकर, सुधीर दिवे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

नागपुरात बोन मॅरो ट्रान्सप्लांटची व्यवस्था

पूर्व विदर्भ आणि उत्तर नागपूर या भागामध्ये सिकलसेल थैलसिमियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. या रुग्णावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा महत्वाचा उपचार आहे. त्यासाठी नागपुराबाहेर जावे लागते. याचा विचार करता नागपुरात बोन मॅरो ट्रान्सप्लांटची व्यवस्था केली जाईल, अशी घोषणा नितीन गडकरी यांनी केली.गरजुपर्यंत लाभ पोहोचविण्यास कटिबद्ध : फडणवीस

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन् नितीन गडकरी यांनी नागपुरात घेतलेला पुढाकार ही देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. नागपूर शहरातील प्रत्येक दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिक या योजनेपासून लाभान्वीत व्हावा, यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूरBJPभाजपा