शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर  नजीकच्या  कळमेश्वर वन परिक्षेत्रात बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:28 IST

कळमेश्वर वन परिक्षेत्रात येणाऱ्या पानउबाळी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना तो दिसला असून त्या संदर्भात वन विभागाला माहिती देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नीटवर्कनागपूर : कळमेश्वर वन परिक्षेत्रात येणाऱ्या पानउबाळी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना तो दिसला असून त्या संदर्भात वन विभागाला माहिती देण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार, नागपूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेचे (एलसीबी) पथक सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर गडेकर यांच्यासह या परिसरात शनिवारी गस्तीवर होते. दरम्यान सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांना पानउबाळी गावाजवळील बस थांब्याच्या जवळच असलेल्या नाल्यामध्ये एक बिबट्या दिसला. काही वेळाने तो गावाच्या दिशेने गेला. त्यामुळे सावधगिरीचा इशारा म्हणून या पथकाने गावच्या पोलीस पाटलाला मोबाईलवरून या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर वन विभागाच्याही कानावर ही माहिती टाकण्यात आली.या परिसरात मागील काही महिन्यापूर्वी गावकऱ्यांना बिबट्या दिसला होता. मधल्या काळात तो या परिसरात आढळला नव्हता. मात्र आता पुन्हा त्याचे दर्शन झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कळमेश्वरचे वन परिक्षेत्र अधिकारी ए.आर. नोकरकर यांना या संदर्भात विचारणा केली असता, या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. आरक्षित जंगलामध्ये बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता बिबटे जंगलाबाहेरच्या क्षेत्रात फिरत असल्याचे त्यांनी सांगितले. या परिसरात बिबट्या दिसल्याच्या माहितीची खातरजमा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :leopardबिबट्याnagpurनागपूर