शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! बोरगावच्या गोकुल हाऊसिंग सोसायटीत बिबट्या; नागरिकांत भीतीचे वातावरण

By जितेंद्र ढवळे | Updated: October 4, 2023 15:50 IST

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नागपूर : पश्चिम नागपुरातील बोरगाव येथील गोकुल हाऊसिंग सोसायटीत बुधवारी पहाटे बिबट्या शिरला. सोसायटीतील कान्हा रिजन्सीतील कुत्र्यांची शिकार करण्यासाठी हा बिबट्या पाठलाग करीत असल्याचा व्हिडीओ बिल्डिंगच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून परिसरातील नागरिकांत यामुळे प्रचंड दहशत पसरली आहे.

यापूर्वी गोरेवाडा जंगलाच्या सुरक्षा भिंतीवर लाव्हा आणि गोरेवाडा वस्ती परिसरात बिबट्या दिसला होता. मात्र आता दाट लोकवस्ती असलेल्या गोकुल हाऊसिंग सोसायटीतच बिबट्या शिरल्याने नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोकुल हाऊसिंग सोसायटीत किमान ४५ हुन अधिक फ्लॅट स्किम आहेत. याशिवाय सोसायटीच्या बाजूला बोरगाव वस्ती आहे.

गोकुल हाऊसिंग सोसायटीलगत पश्चिम दिशेला मिल्ट्रीचे तारांचे कुंपण आहे. या परिसरात झुडपी जंगल आहे. याशिवाय उत्तर दिशेला गोरेवाडा जंगल आहे. हा बिबट्या शिकारीच्या शोधात मिल्ट्रीच्या ताराच्या कुंपणातून आत शिरला असावा, असा स्थानिकांचा अंदाज आहे. बिबट्या बुधवारी पहाटे ४:१५ वाजता कान्हा रिजन्सीच्या सीसीटीव्हीत कैद झाला. यात तो बिल्डिंगमधील श्वानांचा पाठलाग करीत असल्याचे दिसून आले आहे. स्थानिकांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली.

गोरेवाडा तलावावर सकाळी आणि सायंकाळी फिरायला (वॉकिंग) जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. काही महिन्यापूर्वी या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने प्रशासनाने नागरिकांना जंगल परिसरात फिरण्यास बंदी घातली होती. मात्र बंदी शिथिल झाल्यानंतर सकाळी आणि सायंकाळी फिरणाऱ्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. अशात बिबट्याचा दाट लोकवस्तीत वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

टॅग्स :leopardबिबट्याnagpurनागपूर