शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:48 IST

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर रामटेक वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या देवलावार-पवनी रस्त्यावर एका जखमी मादी बिबट्यास वन अधिकाऱ्यांच्या चमूने पकडले. हा बिबट शनिवारी पहाटे रस्ता ओलांडत असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाला होता.

ठळक मुद्देदेवलापार-पवनी रस्त्यावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क       नागपूर : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर रामटेक वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या देवलावार-पवनी रस्त्यावर एका जखमी मादी बिबट्यास वन अधिकाऱ्यांच्या चमूने पकडले. हा बिबट शनिवारी पहाटे रस्ता ओलांडत असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाला होता.वन अधिकाऱ्यानुसार त्याचे वय अंदाजे अडीच ते तीन वर्षे आहे. जखमी झाल्यानंतर बिबट रस्त्याच्या बाजूला खोदण्यात आलेल्या नालीत पडला होता. परंतु तो शुद्धीत होता. त्याचा आवाज ऐकून रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनी स्थानिक वन अधिकाऱ्यांना सूचना दिली. स्थानिक अधिकाऱ्यांनी मादा बिबटची प्रकृती गंभीर असल्याने नागपुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचित केले. सकाळी ९.३० वाता सेमिनरी हिल्स येथील रेस्क्यू टीमला घटनास्थळी रवाना करण्यात आले. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळ पूर्णपणे सील केले. यानंतर नालीमध्येच औषधाचे इंजेक्शन मारून बिबट्यास बेशुद्ध केले आणि जाळीत पकडण्यात आले.या रेस्क्यू आॅपरेशनदरम्यान मोठ्या संख्येने नागरिक व रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनी गर्दी केली. जखमी बिबट्यास नागपूरच्या अलंकार टॉकीजजवळच्या व्हेटरनरी रुग्णालयात आणून एक्स-रे काढण्यात आला. त्यात त्याच्या छातीवर मार असल्याचे आढळून आले. यानंतर उपचारासाठी त्याला गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये नेण्यात आले. परंतु काही अधिकारी व वन्यजीवप्रेमी बिबट्याचा उपचार सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये करण्यासाठी आग्रही होते.एसीएफने नागरिकास मारलेस्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रेस्क्यू आॅपरेशननंतर बिबट्यास पिंजऱ्यात टाकून नागपूरकडे रवाना करीत असताना पाहणाऱ्यांची गर्दी जमली. बिबट्याला पाहण्यासाठी एक व्यक्ती वन अधिकाऱ्याशी वाद घालू लागला. तेव्हा संतापून एसीएफ बोराडे यांनी त्याला मारल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :leopardबिबट्याAccidentअपघात