शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रणभूमीतील दिग्गज; रामटेकच्या रणभूमीत आतापर्यंत एकच महिला खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 14:05 IST

रामटेक लोकसभा क्षेत्रातील सार्वत्रिक निवडणुकीत आतापर्यंत एकूण १४ महिलांनी नशीब आजमावले. परंतु त्यापैकी एकाच महिलेला विजयाची संधी मिळाली.

ठळक मुद्देराणी लढली अन् जिंकलीही!

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेक लोकसभा क्षेत्रातील सार्वत्रिक निवडणुकीत आतापर्यंत एकूण १४ महिलांनी नशीब आजमावले. परंतु त्यापैकी एकाच महिलेला विजयाची संधी मिळाली. त्यातही ही संधी मिळाली ती ११ व्या सार्वत्रिक निवडणुकीत राणी चित्रलेखा भोसले यांच्या रूपाने. रामटेकच्या पहिल्या महिला खासदार होण्याचा मान हा त्यांना जातो. विशेष म्हणजे, त्यानंतर या मतदारसंघातून महिलेचा विजय झालेला नाही.रामटेक लोकसभा क्षेत्र स्वतंत्रपणे अस्तित्वात आल्यानंतर या मतदार संघातील मतदारांनी आतापर्यंत १५ सार्वत्रिक आणि दोन पोटनिवडणुकीचा अनुभव घेतला. १९५७ मध्ये या मतदारसंघात काँग्रेसचे कृष्णराव देशमुख विजयी झाले. देशमुख यांना १ लाख ६६ हजार १२३ मते मिळाली तर त्यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवार कृष्णराव यावलकर यांनी १ लाख २ हजार ४५० मते घेतली. यानंतर १९६२, १९६७, १९७१ मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली.पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर तब्बल २० वर्षांनी या मतदारसंघातून अलका पांडे या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या. त्यांनी १८६४ मते घेतली. त्या निवडणुकीत काँग्रेसचे जतिराम बर्वे (१,९६,९७७ मते) हे विजयी झाले. १९८९ मध्ये लोकदलर्फे लता क्षत्रीय यांनी निवडणूक लढविली. मात्र काँग्रसेच्या पी. व्ही. नरसिंहराव (२,५७,८०० मते) यांच्यासारखा दिग्गज समोर असल्याने त्यांना केवळ ६७७ मते मिळाली. १९९९ मध्ये काँग्रेसच्या तेजसिंगराव भोसले यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणाऱ्या देवकीबाई नगरकर यांना १,६१४ मते प्राप्त झाली. १९९६ मध्ये पहिल्यांदा एकापेक्षा अधिक महिला निवडणूक रिंगणात उतरल्या.कमलताई घटे आणि लता फुलझेले यांनी अनुक्रमे ९८९ व ९६४ मते घेतली. काँग्रेसचे दत्ता मेघे (२,०७,१८८) हे त्या निवडणुकीत विजयी झाले.१९९८ मध्ये दिग्गज रिंगणात असताना काँग्रेसच्या राणी चित्रलेखा भोसले यांना रामटेकच्या पहिल्या महिला खासदार होण्याचा मान मिळाला. शिवसेनेकडून अशोक गुजर तर बहुजन समाज पक्षाकडून राम हेडाऊ हे विरोधक निवडणुकीला उभे होते. ६७,०३८ मतांनी भोसले यांनी गुजर यांचा पराभव केला होता. यानंतर १९९९ मध्ये राजश्री देवी यांनी गोंडवाना गणतंत्र पक्षाकडून तर २००४ मध्ये नयना धवड-पांडे यांनी नशीब आजमावले. परंतु, त्या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेच्या सुबोध मोहिते यांचा विजय झाला. २००९ मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या रामटेक लोकसभा क्षेत्रातून बहुजन रिपब्लिकन एकता मंचकडून सुलेखा कुंभारे, समाजवादी पक्षातर्फे माया चवरे आणि डेमोक्रॅटिक सेक्युलर पार्टीतर्फे सीमा रामटेके यांनी निवडणूक लढविली. मात्र २००९ मध्येही महिलेला विजयाची संधी मिळाली नाही. निवडणुकीत काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांचा विजय झाला. यानंतर २०१४ च्या निवडणुकीत येथे तीन महिलांनी नशीब अजमाविले. यात बसपाच्या किरण पाटणकर यांना ९५ हजार ०५१ मतावर समाधान मानावे लागले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक