शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

रणभूमीतील दिग्गज; दत्ता मेघेंनी भेदला होता ३७ उमेदवारांचा चक्रव्यूह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 11:39 IST

तेजसिंहराव भोसले याच्यानंतर काँग्रेसने १९९६ मध्ये दत्ता मेघे यांना रामटेकच्या रणभूमीत उतरविले. मात्र १९९६ ची निवडणूक रामटेकमध्ये गाजली ती ३८ उमेदवारांच्या उमेदवारीने.

ठळक मुद्देलांबलचक मतपत्रिकेने घेतली मतदारांची परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: तेजसिंहराव भोसले याच्यानंतर काँग्रेसने १९९६ मध्ये दत्ता मेघे यांना रामटेकच्या रणभूमीत उतरविले. मात्र १९९६ ची निवडणूक रामटेकमध्ये गाजली ती ३८ उमेदवारांच्या उमेदवारीने. मेघे यांची रामटेकमध्ये घेराबंदी करण्यासाठी सर्वच पक्षांनी रणशिंग फुंकले होते. देशात पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारचा कार्यकाळ संपला होता. तेव्हाची ही निवडणूक रामटेकच्या मतदारांच्या आजही स्मरणात आहे. त्यावेळी मतपत्रिकांचा उपयोग होत असल्याने उमेदवार, निवडणूक चिन्ह शोधण्यासाठी मतदारांना बरीच कसरत करावी लागली. विशेष म्हणजे या निवडणुकीत तब्बल १० हजार ७२७ मते अवैध ठरली होती. हाही या मतदारसंघाला वेगळा विक्रम म्हणावा लागेल. अशाही स्थितीत मेघे यांना निवडणुकीत एकूण मतांच्या ३७.७९ टक्के अर्थात २ लाख ७ हजार १८८ मते मिळाली. मेघेंनी ३७ उमेदवारांचा चक्रव्यूह भेदत रामटेकच्या गडावर काँग्रेसचा झेंडा फडकाविला. शिवसेनेचे प्रकाश जाधव यांनी १ लाख ८१ हजार ४६६ मते घेत दुसरा क्रमांक गाठला. गोविंदराव वंजारी यांनी लाखावर मते घेतली. कयोमुद्दीन पठाण वगळता इतरांना मात्र चार अंकाच्या वर मते घेता आली नाही. सर्व अपक्ष उमेदवार मिळून एकूण ५४ हजार ८१ मते मिळाली हे विशेष. १९९६ मध्ये मेघे यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे प्रकाश जाधव, जनता दलतर्फे गोविंदराव वंजारी, बोल्शेविक पार्टी आॅफ इंडियातर्फे प्रभूदास ढोरे, भा.रा.इं.काँ (तिवारी)तर्फे केशव शेंडे यांच्यासह अपक्ष म्हणून डॉ. अब्दुल वकील सिद्दीकी, ईश्वरदास सनेश्वर, मोहन कारेमोरे, गणेश खारकर, देवीदास गणवीर, रामदास गावंडे, दिनाजी गिरीधर, कमलबाई घाटे, रेवराम चक्रवर्ती, केशव चरडे, प्रकाशचंद्र तायवाडे, रामकृष्ण दाणी, ज्ञानेश्वर दंढारे, हरीचंद्र धावडे, सुदेश नाईक, कयोमुद्दीन पठाण, अजय पाठक, लीलाधर पालीवाल, पांडुरंग पौनीकर, लता फुलझेले, वीरेंद्र बागडे, ज्ञानेश्वर भगत, मनोहर डोेंगरे, इंद्रराजसिंग मसराम, राजू माहुरे, प्रकाश लोणारे, डॉ. गजानन वझलवार, बबन वानखेडे, शंकर चोखारे, कचरू शिंगाडे, रामकृष्ण शेंडे, परमात्मा सातपुते, मानसिंग सेंगर हे निवडणूक रिंगणात होते.

टॅग्स :Datta Megheदत्ता मेघे