शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
3
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
4
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
5
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
6
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
7
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
8
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
9
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
10
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
11
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
12
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
13
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
14
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
15
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!
16
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
17
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
18
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
19
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
20
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."

रणभूमीतील दिग्गज; भोसल्यांची रामटेकच्या गडावर चढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 13:50 IST

रामटेकच्या रणभूमीत भोसले घराण्याला मतदारांनी डोक्यावर घेतल्याचा इतिहास आहे. १० व्या आणि १२ व्या लोकसभेत भोसले घराण्याला काँग्रेसच्या माध्यमातून संसदेत प्रतिनिधित्व मिळाले.

ठळक मुद्देतेजसिंहराव आणि राणी चित्रलेखा भोसले पोहचले संसदेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: रामटेकच्या रणभूमीत भोसले घराण्याला मतदारांनी डोक्यावर घेतल्याचा इतिहास आहे. १० व्या आणि १२ व्या लोकसभेत भोसले घराण्याला काँग्रेसच्या माध्यमातून संसदेत प्रतिनिधित्व मिळाले. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी रामटेक लोकसभा मतदार संघ सोडल्यानंतर काँग्रेसने तेजसिंहराव भोसले यांना रामटेकच्या रणभूमीत उतरविले. त्यांची टक्कर भाजपचे पांडुरंग हजारे आणि जनता दलाचे चंद्रशेखर वानखेडे आणि बसपाचे मा. म. देशमुख यांच्यासोबत होती. काँग्रेसला देशात धक्के बसत असताना तेजसिंहराव भोसले यांनी १ लाख ३७ हजार ९५४ मतांनी विजय मिळवीत रामटेकच्या गडावर चढाई केली. तेजसिंहराव भोसले यांना २ लाख ४० हजार ४३७ मतदारांनी पसंती दर्शविली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे पांडुरंग हजारे यांना १ लाख २ हजार ४८३ मते मिळाली. जनता दलाचे चंद्रशेखर वानखेडे हे ५३ हजार ५३७ मतावरच थांबले. बसपाचे मा. म. देशमुख यांना १२ हजार ३९३ मतांवर समाधान मानावे लागले. देशात चंद्रशेखर यांचे सरकार पडल्यानंतर २१ जून १९९१ ला पी. व्ही. नरसिंहराव देशाचे पंतप्रधान झाले. त्यामुळे राजकीयदृष्ट्या रामटेकची देशात वेगळी ओळख निर्माण झाली. या निवडणुकीत एकूण मतदानाच्या ५५.६३ टक्के मते तेजसिंहराव भोसले यांना मिळाली. यानंतर १९९६ मध्ये अकरावी लोकसभा अस्तित्वात आली. त्यावेळी काँग्रेसचे दत्ता मेघे यांनी रामटेकचे प्रतिनिधित्व केले. १९९८ मध्ये बाराव्या लोकसभेसाठी काँग्रेसने पुन्हा एका भोसले घराण्यावर विश्वास टाकला. राणी चित्रलेखा भोसले ६७ हजार ३८ मतांचे मताधिक्य घेत संसदेत पोहोचल्या. दुसऱ्यांदा भोसल्यांनी पुन्हा रामटेकचा गड सर केला. यावेळी सेनापती राणी चित्रलेखा होत्या. चित्रलेखा भोेसले यांच्याविरोधात शिवसेनेचे अशोक गुजर आणि बसपाचे माजी खा. राम हेडाऊ मैदानात होते. सेनेच्या वाघाने राणींना गड सर करताना या निवडणुकीत घाम फोडला.राणी चित्रलेखा भोसले यांना ३ लाख २५ हजार ८८५ मते मिळाली तर अशोक गुजर यांना २ लाख ५८ हजार ८४७ मते मिळाली. राम हेडाऊ या निवडणुकीत फारसा चमत्कार करू शकले नाही. त्यांना केवळ ३० हजार ९४९ मतावरच थांबावे लागले. रामटेक लोकसभा क्षेत्रातील पहिल्या महिला खासदार होण्याचा मानही राणी चित्रलेखा भोसले यांना या निवडणुकीत मिळाला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक