शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

मुलीला मारहाण; सासऱ्याने तोडला जावयाचा पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 12:15 IST

प्रेमविवाह झाल्याच्या काही दिवसानंतरच पटत नसल्यामुळे पती-पत्नीत वाद सुरू होता. यातच बुधवारी पतीने पत्नीला मारहाण केली, याबाबत तिने वडीलांकडे तक्रार केली व सासऱ्याने आपल्या मुलीशी वाद घालणाऱ्या जावयाचा पायच फ्रॅक्चर केला.

ठळक मुद्देप्रेमविवाहात कुरबूर

नागपूर : मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाचा पाय सासऱ्याने फरशी मारून फ्रॅक्चर केला. ही घटना जाटतरोडी इमामवाडा येथे घडली असून सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

माहितीनुसार, सौरभ ऊर्फ बेसन मसराम (रा. जाटतरोडी इमामवाडा) याचे त्याच्या शेजारीच राहणाऱ्या खुशी नामक तरुणीसोबत सूत जुळले. दोघांनीही प्रेमविवाह केला. यानंतर दोघांचा सुखीसंसार सुरू होता. मात्र, काही दिवसातच संसाराचे ओझे वाटायला लागल्यामुळे दोघांत कुरबूर सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून सौरभ आणि खुशी यांच्यात कौटुंबिक कलहातून वाद सुरू होता. याच कारणातून बुधवारी दोघांत भांडणं झाली

या वादातत सौरभने खुशीला मारहाण केली. याबाबत तिने तिचे वडील बबलू चांदेवार यांना फोन करून झालेला वाद व पतीने केलेल्या मारहाणीबाबत सांगितले. खुशीच्या वडीलांनी लगेच तिचे घर गाठले व सौरभची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सौरभ रागाच्या भरात काही ऐकूनच घेत नव्हता, त्यात जावई-सासरा असा वाद सुरू झाला. इकडे खुशी सौरभला शिवीगाळ करीत होती. तेवढ्यात खुशीचे वडील बबलू चांदेकर यांनी रागात बाजुला असलेली फरशी उचलून सौरभच्या पायावर मारली. यात त्याचा पाय फ्रॅक्चर झाला.

याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी खुशी आणि तिच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर, सौरभचा पाय फ्रॅक्चर झाल्याने त्याला डॉक्टरांनी चार महिने बेडवर आराम सांगितला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार