शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

हलगर्जीपणा भोवला, नागपुरातील दोन पोलीस ठाण्यांतील डीबी पथके बरखास्त

By योगेश पांडे | Updated: April 25, 2025 01:20 IST

पोलिस आयुक्तांकडून कठोर कारवाई

नागपूर : मागील काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारी व हत्यांचे सत्र सुरू असून काही पोलिस ठाण्यांतील डीबी पथके हे पांढरे हत्ती ठरू लागले आहे. अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मार्च महिन्यातील पांढराबोडीतील हत्याकांड तसेच कॅफेचालकाची गोळ्या झाडून झालेली हत्या व कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रॉपर्टी डीलरची भर रस्त्यावरील हत्या या दोन्ही बाबी पोलिस आयुक्तांनी गंभीरतेने घेतल्या आहेत. अंबाझरी व कपिलनगरातील डीबी पथके बरखास्त करण्यात आली आहेत. ‘लोकमत’ने या डीबी पथकांच्या निष्क्रियतेवर प्रकाश टाकला होता व त्यानंतर तातडीने पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी कठोर पावले उचलली आहेत, हे विशेष.मागील काही दिवसांपासून नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेला गुंडांकडून खुलेआम आव्हान दिले जात आहे. हत्या सत्रासोबतच गँगवॉरमधूनदेखील बऱ्याच घटना झाल्या आहेत. खुलेआमपणे फायरिंग करणे, सीसीटीव्हीसमोर येऊन हत्या करणे असे प्रकार चिंताजनक आहेत. विशेष म्हणजे, अनेक सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात गुप्तचर यंत्रणा व डीबी पथके अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून आले. पोलिस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गुन्हेगारांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी डीबी स्क्वॉडची मोठी भूमिका ठरते. मात्र डीबी पथकाकडून अनेकदा अर्थपूर्ण लक्ष ठेवण्यावर भर देण्यात येतो. गुन्हेगारांची माहिती, त्यांची उठबस याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. याचाच फायदा हिरणवारसारख्या गुन्हेगारी टोळ्या उचलत आहेत. अंबाझरी व कपिलनगर पोलिस ठाण्यातील डीबी पथकांच्या निष्क्रियतेमुळे गुंडांची हिंमत वाढली होती. अखेर पोलिस आयुक्तांनी पुढाकार घेत या दोन्ही पोलिस ठाण्यांतील डीबी पथकांना बरखास्त केले. त्यांच्या ठिकाणी नवीन डीबी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षमता तपासणारया कारवाईमुळे इतर अकार्यक्षम डीबी पथक व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखणे याला सर्वोच्च प्राधान्य आहे. गुन्हेगारीबाबत कुठलीही हलगर्जी व शिथिलता सहन करण्यात येणार नाही. डीबी पथकांमध्ये कार्यक्षम लोकांना समावेश करून, गुन्हेगार आणि बेकायदेशीर व्यवसायांवर नियंत्रण ठेवले जाईल. पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षमतांची नियमित चाचपणी करण्यात येईल व आवश्यकतेनुसार तातडीने कारवाई करण्यात येईल, असे पोलिस आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Policeपोलिस