शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मनीषनगर आरओबी बॉस्ट्रिंग स्टील गर्डरचे लॉन्चिंग पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:47 IST

तांत्रिकदृष्ट्या अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजले जाणारे मनीषनगर आरओबीचे (रेल्वे ओव्हर ब्रिज) काम महामेट्रोने शनिवार मध्यरात्री चार तास रेल्वे सेवा थांबवून कार्य पूर्ण केले. एवढ्या कमी वेळेकरिता ब्लॉक घेण्याचा हा नागपुरातला पहिलाच प्रसंग आहे.

ठळक मुद्देचार तास रेल्वे सेवा थांबविली : ऑक्टोबरपासून आरओबी व आरयूबी खुला होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तांत्रिकदृष्ट्या अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजले जाणारे मनीषनगर आरओबीचे (रेल्वे ओव्हर ब्रिज) काम महामेट्रोने शनिवार मध्यरात्री चार तास रेल्वे सेवा थांबवून कार्य पूर्ण केले. एवढ्या कमी वेळेकरिता ब्लॉक घेण्याचा हा नागपुरातला पहिलाच प्रसंग आहे. यापूर्वी खापरी येथे उड्डाणपुलाच्या बांधकामात अशाच प्रकारे रेल्वे ब्लॉक घेतला होता. याकरिता भारतीय रेल्वेने सहकार्य केले. यामुळे ऑक्टोबर २०२० पासून आरओबी व आरयूबी नागरिकांकरिता खुला होणार आहे.मनीषनगर रेल्वे क्रॉसिंगवरून मार्ग तयार करण्याकरिता एकूण ६४.३८ मीटर लांब गर्डरची आवश्यकता होती. त्यापैकी १९ मीटरचे कार्य महामेट्रोने आधीच पूर्ण केले होते. उर्वरित ४५ मीटर लांब बॉस्टिंग स्टील गर्डरचे लान्चिंग यशस्वीरीत्या पूर्ण गेले. या आरओबीची लांबी ४३. ४८ मीटर व रुंदी १२.६ मीटर आहे. आरओबीसोबत दोन्ही बाजूने प्रत्येकी १.५ मीटर पायी चालण्याकरिता फुटपाथची व्यवस्था आहे. ३६० टन क्षमतेचे स्टील गर्डर ई-३५० ग्रेडचे असून आरडीएसओच्या मानकानुसार तयार करण्यात आले. गर्डरला आधार देण्याकरिता खालून अंदाजे ४५०-५०० टन स्टीलचा उपयोग करण्यात आला. यामुळे रेल्वे रुळावर मनीषनगर परिसर आणि वर्धा मार्गावरील उज्ज्वलनगर हे दोन मार्ग एकमेकांना जोडल्या गेले. मुख्य म्हणजे आरओबीचे कार्य पूर्ण झाल्याने हा पूल आता वर्धा मार्गावरील तीनस्तरीय प्रणालीला (रस्ता, डबल डेकर उड्डाणपूल व मेट्रो मार्ग) हा आरओबी आता जोडला जाणार आहे. या कामाकरिता महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी मेट्रो कामगार तसेच अधिकाऱ्यांचे कौतुक केले आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. महामेट्रोने जमिनी मार्गावरून ५०० मीटर लांब आरयूबी तयार केला असून ६४.३८ मीटर लांब आरओबीचे कार्य पूर्ण केले आहे.याकरिता भारतीय रेल्वेचे मुख्य पूल अभियंता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (मध्य रेल्वे) अतिरिक्त विभागीय रेल्वे प्रबंधक (इन्फ्रा - मध्य रेल्वे), अतिरिक्त विभागीय रेल्वे प्रबंधक (ऑपरेटिंग-मध्य रेल्वे), वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक, वरिष्ठ विभागीय अभियंता, वरिष्ठ विभागीय अभियंता (मध्य) यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर