शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा शुभारंभ : स्वच्छतेची घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 20:34 IST

स्वच्छता ही लोकचळवळ निर्माण होण्यासाठी स्वत:पासून सुरूवात करणे गरजेचे आहे, असे मत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ करताना जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जि.प. अधिकाऱ्यांनी काढला केर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छता ही लोकचळवळ निर्माण होण्यासाठी स्वत:पासून सुरूवात करणे गरजेचे आहे, असे मत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ करताना जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना व उपस्थित कर्मचाऱ्यांना जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्याचे आवाहन केले.स्वच्छता ही सेवा- २०१९ या उपक्रमाच्या जिल्हास्तरीय शुभारंभ संजय यादव यानंी श्रमदानाच्या माध्यमातून केला. यावेळी उपस्थित अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक इलमे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी प्रिया तेलकुंटे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल किटे, जिल्हा आरोग्य अघिकारी डॉ. दीपक सेलोकर, समाजकल्याण अधिकारी सुकेशिनी तेलगोटे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता बी. व्ही. सयाम, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव हेमके तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेचा परिसर स्वच्छ केला.पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी सन २०१७ पासून स्वच्छता ही सेवा उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत असून या माध्यमातून शौचालयाचा नियमित वापर, स्वच्छतेसाठी बदल घडविणारे उपक्रम आणि सार्वजनीक ठिकाणी श्रमदान केले जात आहे. स्वच्छता ही सेवा- २०१९ मध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. या अभियानाची जिल्ह्यात २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत अंमलबजावणी होणार आहे. या उपक्रमाची जिल्हाभर व्याप्ती वाढविण्यासाठी सर्व पंचायत समिती, ग्रामपंचायतींना महाश्रमदानाचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहे. ग्रामस्थांनी ‘स्वच्छ व सुंदर गाव’ ही वैयक्तिक जबाबदारी समजून यात सहभागी व्हावे.अनिल किटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता), जि.प.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान